Nashik Police Recruitment : नाशिक ग्रामीण दलात 179 पोलिस होणार सामील!

Police recruitment
Police recruitmentesakal

Nashik Police Recruitment : नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त पदांसाठी २ तारखेला घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला असून, उमेदवारांची प्रतिक्षा संपली आहे.

ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने जाहीर केलेल्या निकालावर आक्षेप न आल्यास काही दिवसात नियुक्तीबाबतची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिस दलामध्ये नव्याने १७९ पोलिस सामील होणार आहेत.या साठी सुमारे २१ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. (Nashik Police Recruitment 179 policemen will join Nashik Gramin Dal news)

गेल्या डिसेंबर २०२२ मध्ये राज्य शासनाने पोलिस भरतीचा निर्णय घेत ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासूनची रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने राज्यभरात भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साह संचारला होता.

नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त १७९ पदासाठीही भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी राज्यभरातून २१ हजार ४९ उमेदवारांचे अर्ज आले होते. यात १८ हजार ९३५ पुरुष तर, २ हजार ११४ महिला उमेदवारांचे अर्ज होते.

विशेषतः: यावेळी तीन तृतीयपंथी उमेदवारांचेही अर्ज होते, परंतु गृह विभागाकडून या संदर्भात स्पष्ट आदेश नसल्याने या उमेदवाराची मैदानी चाचणी होऊ शकली नाही.

नाशिक ग्रामीण पोलिस दलात १६४ पोलिस शिपाई तर १५ पोलिस वाहन चालक या रिक्तपदांसाठीची मैदानी चाचणीची प्रक्रिया गेल्या जानेवारी महिन्यात राबविण्यात आली होती. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या चालक व शिपाई पदाच्या उमेदवारांची लेखी परीक्षा २९ मार्च व २ एप्रिल रोजी पार पडली.

शिपाई पदासाठी ११ हजार २४४ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. त्यापैकी ४ हजार ५१८ उमेदवारांनी २५ पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. त्यातून १ हजार ८६१ उमेदवारांना लेखी परीक्षेला पाचारण करण्यात आले होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Police recruitment
Dr. Ambedkar Jayanti : धुळ्यात 4 मार्गांच्या वाहतुकीत बदल

यातून १ हजार ३२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले होते. १५ चालक पदांसाठी २ हजार ११४ प्राप्त अर्जापैकी १ हजार २४० उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. त्यापैकी १ हजार २२ उमेदवारांनी वाहन चालवण्याची चाचणी दिली.

त्यातून निवडलेल्या १२४ उमेदवारांपैकी १२२ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. त्यापैकी १५ उमेदवारांची पोलिस चालक पदासाठी निवड केली जाणार आहे.

प्रवर्गानुसार अव्वल गुण

पोलिस शिपाई

- खुला प्रवर्ग : १४० गुण

- ओबीसी : १३४

- इडब्ल्यूएस : १३४

- एससी : १३३

- एसटी : १३१

- व्हीजे-ए : १३२

- एनटी-बी : १३१

- एनटी-सी : १२९

- एनटी-डी : १३२

- एसबीसी : १२४

* चालक पद

- खुला प्रवर्ग : १४६

Police recruitment
NDCC Recovery : जिल्हा बॅंकेची वसुलीत यंदा घटणार? एनपीए वर परिणाम होण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com