NDCC Recovery : जिल्हा बॅंकेची वसुलीत यंदा घटणार? एनपीए वर परिणाम होण्याची शक्यता

NDCC Bank
NDCC Bankesakal

NDCC Recovery : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्या झालेल्या बिऱ्हाड आंदोलनानंतर पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून काढण्यात आलेल्या त्या पत्रामुळे बॅंकेची वसुलीवर परिणाम झालेला असताना मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी, गारपिटीमुळे वसुली पूर्णतः ठप्प झाली आहे.

परिणामी बॅंकेची वसुलीत यंदा ८० ते १०० कोटींनी घट होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वसुली घटल्याने बॅंकेच्या एनपीएवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. (NDCC Recovery Will recovery of district bank decrease this year Potential impact on NPA nashik news)

जिल्हा बॅंकेच्यावतीने सुरू असलेल्या लिलाव प्रक्रीया विरोधात पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने जानेवारीत बिऱ्हाड आंदोलन केले. या आंदोलनानंतर, पालकमंत्री भुसे यांच्या सूचनेनुसार जिल्हा बॅंकेने विविध कार्यकारी सोसायट्यांकडून थकबाकीदार सभासदांवर ६ टक्के, ७ टक्के व ८ टक्के दराने होणारे सरळव्याजाची आकारणी करून तशी माहिती मागविली.

या आदेशानुसार बँकेने वि. का. सोसायट्यांना पत्र देत माहिती मागविली देखील. यासाठी पालकमंत्री भुसे यांच्याकडून शासनस्तरावर पाठपुरावा झाला. प्रत्यक्षात मात्र, शासनाकडून याबाबत कोणताही निर्णय झाला नाही.

या प्रक्रियेत बॅंकेची वसुली झाली नाही. गतवर्षी वसुलीचे हेच प्रमाण २६ टक्के होते. यंदा मात्र, एक अंकी टक्यात वसुली झाली असल्याचे समजते. जुनी थकबाकी वसुली करण्याचे प्रमाण संथगतीने सुरू असतानाच, मार्च महिन्यात जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले.

यात पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी पुन्हा संकटात सापडला. या परिस्थितीत बॅंकेकडून वसुली कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला. यात बॅंकेने वसुली मोहीम गुंडाळून ठेवल्याचे बघावयास मिळाले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

NDCC Bank
Jal Jeevan Scheme : जिल्ह्यात 15 दिवसात केवळ 59 जलजीवनच्या योजना सुरू

अवकाळीचे संकट काहीसे दूर होऊन मार्च एण्डींग काही बड्या थकबाकीदारांना थकबाकी भरली त्यामुळे दिलासा मिळाला. हे होत नाहीतोच, जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस झाला. गारपीट होऊन पिकांची मोठी हानी झाली. त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला. परिणामी वसुलीवर याचा मोठा परिणाम झाला.

यामुळे बॅंकेची मार्च २०२३ अखेर वसुली घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत ८० ते १०० कोटींनी कमी वसुली झाली असल्याची चर्चा आहे. वसुली घटल्याने बॅंकेचा एनपीए वाढण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे वसुली घटल्यामुळे खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपावरही परिणाम होण्याची चिन्हे आहे. नियमित अन थकबाकी वसुली झाल्यानंतर यातूनच बॅक शेतक-यांना पीक कर्ज उपलब्ध करून देते. मात्र, नियमित वसुली देखील रखडलेले असल्याने, वसुली झालेली नाही. वसुली नसल्याने पीक कर्ज कसे द्यायचे हा प्रश्न बॅंक प्रशासनास सतावत आहे.

NDCC Bank
Dr. Ambedkar Jayanti : धुळ्यात 4 मार्गांच्या वाहतुकीत बदल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com