Nashik Police: परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना आयजींकडून आढावा! लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर घेतली ‘व्हिसी’

Nashik News : विशेष पोलीस महानिरीक्षक शर्मा यांनी शनिवारी (ता. १) सकाळी नाशिक परिक्षेत्राच्या अतिरिक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे.
Special Inspector General of Police Ranjan Kumar Sharma
Special Inspector General of Police Ranjan Kumar Sharmaesakal

Nashik Police : लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणी मंगळवारी (ता.४) होते आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिस परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परिक्षेत्राचा आढावा घेत, कडेकोट पोलीस बंदोबस्तासह कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासंदर्भात सूचना केल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक शर्मा यांनी शनिवारी (ता. १) सकाळी नाशिक परिक्षेत्राच्या अतिरिक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. (Nashik Police Superintendent reviewed against backdrop of Lok Sabha election counting)

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता.४) होत असल्याने सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले आहेत. नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीणसह जळगाव, धुळे, नंदूरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांतील लोकसभा मतदारसंघातील बहुतांशी जागांवर अटीतटीच्या लढतींचा अंदाज आहे.

तर, काही जागांमध्ये अत्यंत चुरस असून निकाला फेरबदल होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांवर राहणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.

दरम्यान, ३१ मे रोजी डॉ. बी.जी. शेखर हे नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी चार दिवसांवर असल्याने परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्‌था अबाधित राखण्यासाठी गृहविभागाकडून तातडीने राज्याच्या आर्थिक गुन्हेशाखेचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे नाशिक परिक्षेत्राची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (latest marathi news)

Special Inspector General of Police Ranjan Kumar Sharma
PM Modi Message: ध्यान संपलं... एक्झिट पोल जाहीर; PM मोदींचा देशाला उद्देशून संदेश

त्यानुसार शर्मा यांनी शनिवारी (ता. १) तातडीने नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर लगेचच त्यांनी परिक्षेत्रातील पाचही पोलीस अधीक्षकांची ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी संवेदनशिल परिसरात जादा पोलीस बंदोबस्त, मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्ताचे आदेश दिले आहेत.

नगरवर विशेष लक्ष

नाशिक परिक्षेत्रामध्ये सर्वाधिक संवेदनशिल जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याकडे पाहिले जाते. त्यामुळे या जिल्ह्यात जादा फौजफाटा तैनात केला जाण्याची शक्यता आहे. निवडणूक काळातही या जिल्ह्यात सर्वाधिक वादाचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अहमदनगर जिल्ह्याकडेच पोलिसांचे लक्ष राहणार आहे.

"लोकसभा निवडणुकीची दोन दिवसांवर मतमोजणी आहे. त्या दृष्टीकोनातून परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत."

- रंजन कुमार शर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र.

Special Inspector General of Police Ranjan Kumar Sharma
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com