Nashik Police Training : मुंबईच्या पोलिसांकडून नाशिक पोलिस घेणार प्रशिक्षण

Police news
Police newsesakal

नाशिक : नाशिक शहरात वाहतुकीची समस्या गंभीर असली तरी, त्याची कारणे विविध प्रकारची आहेत. वाहतूक पोलीसांना यात काही मर्यादा आहेत. त्यामुळे सुरळीत वाहतुकीसाठी शहर पोलिस कटिबद्ध असून, मुंबईमध्ये वाहतूक नियोजन कसे होते, यासाठी नाशिकचे ५० वाहतूक पोलिस लवकर प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईला जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली. (Nashik Police will take training from Mumbai Police Nashik News)

शहर पोलिस मुख्यालयातील भीष्मराज हॉल येथे आयुक्तालयातर्फे पोलिस व पत्रकारांचा सुसंवाद मंगळवारी (ता. १) पार पडला. या वेळी औपचारिक गप्पा मारताना पोलिस आयुक्तांनी विविध विषयांवर भाष्य करीत भूमिका स्पष्ट केली. या वेळी ‘सकाळ’चे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, उपायुक्त अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले-श्रींगी, विजय खरात, सहायक आयुक्त वसंत मोरे, गंगाधर सोनवणे, दीपाली खन्ना, सोहेल शेख व गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

शहरातील मुंबई नाका, द्वारका, सारडा सर्कल, शालिमार चौक, रविवार कारंजा येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीसंदर्भात बोलताना पोलिस आयुक्त नाईकनवरे म्हणाले, शहरातील ब्लॅकस्पॉट संदर्भात ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे, वाहतूक कोंडी होण्यामागे विविध कारणे आहेत. त्याचे नियोजन करण्यात पोलिसांना मर्यादा आहेत. कोणत्या ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग असावे याबाबतचे नियोजन करण्याचे काम त्यासंबंधित प्रशासनाचे असून त्याबाबत विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि आरटीओ यांच्याशी बैठका घेत त्याचे प्रस्ताव दिले आहेत.

Police news
Bogus Medical Certificate Case : डॉ. श्रीवास यांना अंतरिम जामीन मंजूर

येत्या काही दिवसात त्यावर निर्णय होतील. तर पोलिसांकडून सुरळीत वाहतूक होण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. येत्या काही दिवसात नाशिक वाहतूक पोलिस शाखेचे ५० पोलिस हे मुंबई वाहतूक पोलिसांसमवेत मुंबईमध्ये वाहतूक नियोजनाचे काम पाहतील. त्यानुसार, ते नाशिकमध्ये काम करतील.

याबाबत मुंबईचे पोलिस आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्याचेही आयुक्तांनी सांगितले. त्याचप्रमाणे, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस योग्यरितीने कामकाज करीत आहेत. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संशयितांविरुद्ध तडीपार व स्थानबद्धतेच्या कारवाया केल्या असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

कायद्याच्या चौकटीतच काम

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कोकणे हल्ला प्रकरणात स्वतः मेडीकल रिपोर्टनंतर ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या गुन्ह्यात तपास अधिकाऱ्यांनी संशयितांच्या नातलगांना पंच केल्याचा आरोप संबंधित तक्रारदार व त्यांच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात पोलिस उपायुक्तांमार्फत स्वतंत्र चौकशी केल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त नाईकनवरे यांनी सांगितले.

Police news
Gaming Addiction : शाळकरी 75 टक्के मुले ‘गेमींग'च्या विळख्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com