
Nitesh Karale
esakal
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या अधिवेशनासाठी नाशिकमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मोठी गर्दी जमली होती. पक्षाचे स्टार प्रचारक नितेश कराळे मास्तर यांना पवार यांच्या भेटीसाठी हॉटेल ट्रीटच्या गेटवर पोलिसांनी अडवल्याने त्यांना तब्बल 15 ते 20 मिनिटं ताटकळत उभे राहावे लागले. अखेर फोनाफोनी आणि प्रयत्नांनंतर त्यांना प्रवेश मिळाला. या घटनेने नाशिकमधील राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे.