Nashik News : ‘गोदावरी शोधा, बक्षीस मिळवा’चा सोशल अर्जव! लोकप्रतिनिधी मात्र निवडणूक मोडमध्ये

Nashik News : गेल्या २५ वर्षांपासून निफाडची जीवनवाहिनी असणाऱ्या गोदावरी आणि तिच्या उपनद्यांमध्ये पानवेलीमुळे जलप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Godavari vessel filled with panvelis.
Godavari vessel filled with panvelis.esakal

निफाड : गेल्या २५ वर्षांपासून निफाडची जीवनवाहिनी असणाऱ्या गोदावरी आणि तिच्या उपनद्यांमध्ये पानवेलीमुळे जलप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निफाड तालुक्याच्या सोशल मीडियावर ‘गोदावरी शोधा आणि बक्षीस मिळवा’चा ट्रेंड सुरू असून, नेते व कार्यकर्ते निवडणुकीत ॲक्टिव्ह झाले आहेत. समस्यांचे रडगाणे मात्र पाचवीलाच पुजल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (Nashik pollution Find Godavari get reward social appeal at niphad marathi news)

नाशिक महापालिका हद्दीतील येणाऱ्या दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात पानवेलींची उत्पत्ती होऊन त्यातून समस्या तयार झाल्या आहेत. नांदूरमधमेश्वरच्या बॅक वॉटरचे पाणी निफाडच्या कादवा नदीपात्रात येते. नांदूरमधमेश्वर धरणातील पानवेली आता कादवा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

नाशिक शहरातील सांडपाणी, औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त पाणी गोदावरी नदीत मिसळत असल्याने गोदावरी नदीचे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. या प्रदूषणामुळे येथील नदींमध्ये घाणीचे साम्राज्य झाले असून, मोठ्या प्रमाणात पानवेली तयार झाली आहे.

नागरिकांनी पानवेली काढण्यासंदर्भात प्रशासनाकडे आर्जव केला. मात्र, त्या काढण्याऐवजी पाण्यातच ढकलल्या जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. गोदावरी नदीचे नांदूरमध्यमेश्वर धरणाचे पाणी निफाडला कादवा नदीत येते. त्यामुळे रोटेशन आले, की पानवेली येत असल्यामुळे कादवेच्या पाण्याने रंग बदलला आहे.

त्याचा परिणाम कादवा व गोदावरी नदीकाठालगत असलेल्या निफाड शहरासह तालुक्यातील चाटोरी, सायखेडा, चांदोरी, गोंडेगाव, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, कोठुरे, मांजरगाव आदी गावांतील नळ पाणीपुरवठा योजनांवर होत आहे. या परिसरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गोदावरी नदीतील जलपर्णी काढण्यासह प्रदूषण रोखण्यासाठी सातत्याने महापालिकेसह संबंधित विभागाकडे तक्रार करूनही कुठलीही कार्यवाही प्रशासनाकडून होत नाही. गोदावरी नदीतील प्रदूषणाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्याची धग आता बॅक वाटरद्वारे निफाडकरांना बसत आहे. त्यामुळे गोदा, कादवा काठालगत असलेल्या नागरिकांमध्ये शासनामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

Godavari vessel filled with panvelis.
Nashik News: विक्रोळी स्थानकाची भुसावळ निरीक्षण समितीकडून पाहणी! विकासकामांसाठी 19 कोटींचा निधी

"गोदावरी व कादवा नद्यांत प्रचंड पाणवेली असल्यामुळे जलप्रदूषण होऊन पाण्याचा रंग बदलला आहे. त्याचा पक्ष्यांबरोबर माणसाच्या जीवनावर परिणाम होऊ लागला आहे. नांदूरमधमेश्वर अभयारण्याचा परिसर पाणवेलींनी व्यापला आहे. अभयारण्यातील पक्षी, जलचर व जलवनस्पतींना धोका वाढल्याने पर्यावरणप्रेमींनी ‘गोदावरी शोधाच’ सोशल अर्जव सुरू केला आहे. शासकीय यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे व पाणवेली त्वरित काढाव्यात."

-डॉ. उत्तमराव डेर्ले, अध्यक्षल पक्षी-निसर्गमित्र, निफाड

"निफाड तालुक्यात पानवेलीचा प्रश्‍न अत्यंत जटील बनला आहे. अनेक वर्षांपासून यासंदर्भात निवेदन दिले व आंदोलन केले. मात्र, प्रशासनाला काही जाग येत नाही. गोदाकाठच्या सर्वच गावांच्या आरोग्याचा प्रश्न पानवेलींमुळे ऐरणीवर आला आहे. मात्र, प्रशासनाला जाग येत नाही. वृत्तपत्रात बातमी आल्यानंतर तेवढ्यापुरते पानवेली काढण्याचा फार्स केला जातो आणि नंतर मात्र दुर्लक्ष केले जाते. लोकप्रतिनिधींना याबाबत काही देणेघेणे नसल्याने प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करणार आहे."

-खंडू बोडके-पाटील, शिवसेना नेते, करंजगाव

"निफाड शहरातील कादव नदीचा पानवेलींनी श्वास कोंडला आहे. पाण्याचा रंग बदलला आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन कादवा पात्रासह गोदावरी पानवेलीमुक्त करावी."

-देवदत कापसे, माजी नगरसेवक, निफाड

Godavari vessel filled with panvelis.
Jalgaon News : टोल सुरू होण्यापूर्वीच नाक्याची जाळपोळ; पोलिसात गुन्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com