Jalgaon News : टोल सुरू होण्यापूर्वीच नाक्याची जाळपोळ; पोलिसात गुन्हा

Jalgaon : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सबगव्हाण खुर्द (ता.पारोळा) येथील टोल नाका आज सोमवार (ता.११) पासून सुरु होणार होता.
The destruction of the toll booth and the broken glass in the second photo
The destruction of the toll booth and the broken glass in the second photo esakal

Jalgaon News : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सबगव्हाण खुर्द (ता.पारोळा) येथील टोल नाका आज सोमवार (ता.११) पासून सुरु होणार होता. मात्र त्यापूर्वीच अज्ञात समाजकंटकांनी टोल नाक्याची केबिन जाळून टोलनाक्याचे मोठे नुकसान केले . रविवारी मध्यरात्री कधी तरी घडलेली घटना आज उघडकीस आली. पारोळा तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५३ चे काम जवळपास ९० टक्केच्या आसपास पूर्ण झाले आहे. (Jalgaon Burnt before toll start marathi news)

परंतु फागणे बायपास, रस्ता जळगाव बायपास, सर्विस रोड, लाइट, सुशोभीकरण, दूरध्वनी, झाडे लावणे अशा विविध सुविधा व उपाय योजना अद्यापही बाकी आहे . मात्र काम अपूर्णावस्थेत असताना लगबगीने आज सोमवार (ता.११) पासून टोल नाका सुरू होणार होता. त्याविरोधात नागरिकांचा आक्रोशही होता.

मात्र अशातच रविवारी मध्यरात्री पावने तीन ते सव्वा तीनच्या सुमारास धुळे मार्गाकडून आलेल्या चार चाकी वाहनातून आलेल्या पाच ते सात समाजकंटकांच्या गटाने टोल नाका गाठला लाईन क्रमांक एक वर उतरून त्यांच्या हातातील लोखंडी गज, काठ्यांच्या मदतीने टोल नाक्याच्या केबिनच्या काचा फोडल्या. त्यानंतर केबिनमध्ये आग लावली . टोल नाक्यावरील लाईन क्रमांक दहाचे नुकसान करत त्याच वाहनाने पुन्हा धुळ्याच्या दिशेने रवाना झाले. (latest marathi news)

The destruction of the toll booth and the broken glass in the second photo
Jalgaon Crime News : अवैध वाळु वाहतुकीचा मिनी ट्रक पकडला

सीसीटीव्हीत कैद

दरम्यान हा सगळा टोल नाक्यावरील तोडफोड आणि जाळपोळीचा प्रकार टोल नाक्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्‍यात केबिन जाळणारे व टोल नाक्याचे नुकसान करणारे सिसीटीव्हीत कैद झाले आहेत. दरम्यान पारोळा पोलिसात दगडू सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमांवर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक सुनील पवार करीत आहे.

''अज्ञात व्यक्तीकडून टोल नाक्याची नासधूस झाल्यामुळे दोन लेन मधील दोन केबिन तसेच कॅमेरे जळून खाक झाली आहेत. विना नंबर गाडी व पेट्रोलच्या सहाय्याने आग व दगडफेक करून काचा फोडल्या गेल्या आहेत. संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर टोल सुरू केला जाईल.''- गौतम दत्ता (व्यवस्थापक अग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर)

The destruction of the toll booth and the broken glass in the second photo
Jalgaon News : दिवस उजाडताच 2 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी; फर्निचर दुकानासह वाशिंग सेंटर जळून खाक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com