Nashik Agricultural Success: दुष्काळाशी 2 हात करीत फुलवली डाळिंबाची बाग! जळकू येथील शिंदे बंधुंचा प्रयोग यशस्वी

Nashik News : माळमाथा परिसरात दुष्काळी परिस्थितीशी सामना करुन जळकू येथील शिंदे बंधूंनी डाळिंबबाग फुलवली
Pomegranate orchard in the farm of experimental farmers Nitin Shinde and Amol Shinde
Pomegranate orchard in the farm of experimental farmers Nitin Shinde and Amol Shindeesakal

झोडगे : माळमाथा परिसरात दुष्काळी परिस्थितीशी सामना करुन जळकू येथील शिंदे बंधूंनी डाळिंबबाग फुलवली. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांच्या नशीबी नेहमीच दुष्काळ असतो. अस्मानी सुलतानी संकटांशी दोन हात करून जिद्दीने उभे राहण्याची निसर्गदत्त क्षमताच जणू येथील शेतकऱ्यांना दिली आहे. (Nashik Pomegranate garden Shinde brother from Jalku marathi news)

खडकाळ, माळरान, मुरमाड जमिनीत कुटुंबासह राबणाऱ्या हातांना आर्थिक समृद्धी जणू मृगजळासारखी भासू लागते. उत्पन्न आले तर शेतमालाला भाव नाही. दोन-तीन वर्षांत एकदा दुष्काळ नशीब आहेच.

शेती सिंचनासाठी बारमाही पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध होत नसल्याने निसर्गाच्या भरवशावर शेती व्यवसाय करून येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करून आर्थिक उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करतो. शेतीशिवाय दुसरा पर्याय नसल्याने पावसाचे व विहिरीतील पाणी शेततळ्यात साठवून फळबाग फुलवणारे दुष्काळात फळबाग वाचविण्यासाठी दिव्यातून जाताना दिसतात.

जळकू येथील नितीन शिंदे व अमोल शिंदे या दोन बंधूंनी यंदाच्या पाणीटंचाई काळात दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन काढून दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांना लढण्याचे बळ दिले आहे. शिंदे परिवाराने शेतीसह वीटभट्टी, बिल्डिंग मटेरियल उद्योगातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  (latest marathi news)

Pomegranate orchard in the farm of experimental farmers Nitin Shinde and Amol Shinde
Nashik Agricultural Success: सदाबहार तैवान पेरूची शेती यशस्वी! पालखेड मिरची येथील शेतकऱ्याला एक एकरात 8 लाखांचा नफा

मागील काळात माळमाथ्यासारख्या अवर्षणप्रवण भागात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करून आपली ओळख निर्माण केली होती. शेततळ्यातील पाणी ठिंबक सिंचनाचा वापर करून डाळिंबबाग फुलवली. सोलापूर लाल जातीच्या डाळिंबाना विविध राज्यांतील व्यापारी खरेदीसाठी येथे येताना दिसतात. गुणवत्तापूर्ण डाळिंब उत्पादकांना व डाळिंब शेतीला पुन्हा सुगीचे दिवस येतील, असे शिंदेबंधू सांगतात.

"माळमाथा परिसरात सिंचनासाठी पुरेशी सुविधा नसल्याने अल्प पाण्यात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रयोग करून उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यावर फळबागा नष्ट होताना दिसतात. त्यामुळे दोनचार वर्षांची मेहनत व खर्च वाया जातो. शेती सिंचनासाठी पावसाळ्यात गिरणा, मोसम नदीचे पाणी दहिकुटे धरणात आणून पुढे झोडगे येथे कमुडाग धरण व गुगुळवाड- भिलकोट येथील कान्होळी धरणांची निर्मिती करून साठवलेल्या पाण्यातून सिंचनाचा प्रश्‍न सुटणार आहे."

- नितीन शिंदे, डाळिंब उत्पादक, जळकू

Pomegranate orchard in the farm of experimental farmers Nitin Shinde and Amol Shinde
Nashik Agriculture News: नांदगावची केळी सौदी अरेबियात खाणार भाव! बोराळेच्या राजपूत कुटुंबियांचा प्रयोग यशस्वी; लाखोंची उलाढाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com