Nashik News : तेलही गेले अन् तूपही; प्रशासनाची दिशाभूल अंगलट! पोलिस पाटील पदासाठी ग्रामपंचायतीचे पदही गमावले

Nashik : पोलिस पाटील पदाच्या मोहापायी आधीचे ग्रामपंचायत सदस्यपद गमावण्याची नामुष्की सिन्नर तालुक्यातील रामपूरच्या (पुतळेवाडी) महिलेवर आली आहे.
Fake Document
Fake Documentesakal

Nashik News : पदासाठी कोण काय करेल, याचे काही सांगता येत नाही. पोलिस पाटील पदाच्या मोहापायी आधीचे ग्रामपंचायत सदस्यपद गमावण्याची नामुष्की सिन्नर तालुक्यातील रामपूरच्या (पुतळेवाडी) महिलेवर आली आहे. उजनी व रामपूर या दोन्ही ग्रामपंचायतीत रहिवासी कागदपत्रे बनविण्याचा प्रकार उघड होताच प्रांताधिकाऱ्यांनी या हेराफेरीचा गंभीर दखल घेत या महिलेचे पोलिस पाटील पदही रद्द केले असून, ‘तेलही गेले अन् तूपही’ असेच म्हणण्याची वेळ आली आहे. (post of Gram Panchayat was also lost for post of Police Patil )

निफाड उपविभागांतर्गत सिन्नर तालुक्यातील उजनी येथील रिक्त पोलिस पाटील पदाकरीता निवड झालेल्या नूतन अनिल जाधव यांनी मूळच्या उजनी येथील स्थानिक व कायम रहिवासी असल्याची अट पूर्ण न केल्यामुळे पोलिस पाटील पदाच्या निवड यादीतून त्यांचे नाव वगळत अपात्र घोषित करण्याचे आदेश पोलिस पाटील भरतीच्या अध्यक्ष तथा निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिले आहेत.

पोलिस पाटील भरती प्रक्रियेदरम्यान श्रीमती जाधव या शेजारच्या रामपूर (पुतळेवाडी) ग्रामपंचायत सदस्य होत्या. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत त्यांनी रामपूर ग्रामपंचायत सदस्य म्हणून मतदान देखील केले होते. मात्र, उजनीतील रिक्त पोलिस पाटील पदाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्यांनी घाईने आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. पोलिस पाटील पदाच्या निवड यादीत त्यांचे नावदेखील आले होते.

एकाच वेळी उजनी व रामपूर या दोन गावांमध्ये वास्तव्य करून तेथील वास्तव्याची स्वतंत्रपणे कागदपत्रे बनवणे व दोन्ही गावांमध्ये वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केल्याबाबतची तक्रार पोलिस पाटील पदाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शीतल सुदाम चव्हाण आणि आरती रामहरी सुरसे यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली होती. त्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर वरील धक्कादायक प्रकार उघड झाला.(Latest Marathi News)

Fake Document
Nashik News : गंगापूर धरणात दूषित पाण्यामुळे प्रदूषण! नाशिककरांच्या आरोग्यास धोका; प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

हेराफारीमुळे पदांवर पाणी

सप्टेंबर २०२३ मध्ये निफाड उपविभागातील पोलिस पाटलांच्या रिक्त जागांच्या भरतीसंबंधी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या प्रक्रियेत सहभागी होत उजनी येथील नूतन जाधव यांनी लेखी व तोंडी परीक्षेत बाजी मारली होती. उमेदवारांच्या अंतिम निवड यादीत त्यांचे नाव असल्याने त्या पोलिस पाटील पदासाठी पात्र ठरल्या होत्या.

मात्र, त्या एकाच वेळी रामपूर व उजनी येथील रहिवासी असल्याचे व त्यांनी रामपूर ग्रामपंचायतीत सदस्य पद मिळवल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी त्यांचे नाव अंतिम निवड यादीतून वगळले. तसेच, त्यांना पोलिस पाटील पदाच्या प्रक्रियेतून अपात्र करण्याचा आदेश दिला आहे.

बनावट प्रोसेडिंगवर प्रश्‍नचिन्ह

नूतन जाधव यांनी रामपूर व उजनी या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये विवाह नोंदणी केली आहे. त्यांच्याकडे दोन्ही गावातील निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, शिधापत्रिका असल्याचे पुरावे तक्रारदारांनी सादर केले. एका निवडणूक ओळखपत्रात पती अनिल यांच्याऐवजी सासरे सोपान यांचे नाव लावण्यात आले आहे.

पोलिस पाटील पदाच्या भरतीचा अर्ज सादर केल्यानंतरही श्रीमती जाधव या रामपूर ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या बैठकीला सदस्य म्हणून उपस्थित होत्या. तरीही उजनी ग्रामपंचायतीने त्यांना पोलिस पाटील पद भरतीसाठी आवश्यक रहिवासी दाखले दिले. बनावट प्रोसिडिंग नोंदवल्याविरोधात देखील तक्रारदारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Fake Document
Nashik News : पीसीबी ग्रुपला 95 टक्‍के हजेरी; जिल्ह्यातील 20 हजार 875 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com