Nashik Postal Department : नाशिक टपाल विभाग राज्यात ठरला अव्वल!

Nashik Division Head Post Office GPO
Nashik Division Head Post Office GPOesakal

जुने नाशिक : भारतीय टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल विमा योजनेत नाशिक टपाल विभागाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. ‘महा लॉग इन डे’ दिनानिमित्त राज्याच्या विविध शहराच्या टपाल विभागांना देण्यात आलेल्या उद्दिष्टांत नाशिक विभागाने सर्वाधिक ग्राहक जोडून उत्तम कामगिरी केली. त्यानिमित्ताने हा विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. (Nashik Postal Department become top in state Nashik news)

टपाल विभागातर्फे २३ आणि २४ नोव्हेंबरला राज्यात ‘महा लॉग इन डे’ दिन साजरा करण्यात आला. राज्यातील सुमारे ४४ विभागांनी या दोन दिवसात भारतीय टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा या दोन योजनांमध्ये अधिकाधिक ग्राहक जोडून जास्तीत- जास्त महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. यात पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर अशा विविध मोठ्या शहरांना मागे टाकत नाशिक टपाल विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

भारतीय टपाल जीवन विमा योजनेत नाशिक विभागाने १८९ ग्राहक जोडत १६ लाख ७८ हजार ३०९ रुपयांचा महसूल टपाल विभागास प्राप्त करून दिला. तर ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेत ३३६ ग्राहक जोडून १२ लाख ७६ हजार ५१७ रुपयांच्या महसुलाची टपाल विभागाच्या तिजोरीत भर पाडली.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

Nashik Division Head Post Office GPO
Super 50 Scheme : सुपर फिफ्टी योजनेची निविदा प्रक्रिया लांबणीवर?

अशाप्रकारे नाशिक टपाल विभागाने आपल्या कामाचा डंका संपूर्ण राज्यात वाजविला. टपाल विभाग इतर बँक, विमा कंपन्या, शासकीय योजना योजनेच्या तुलनेत नागरिकांसाठी नवनवीन योजना उपलब्ध करून देत आहे. नागरिकांना त्याचा फायदाही होत आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विभागाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. त्यांच्या योजना नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी कर्मचारी अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने नाशिक टपाल विभागाने पावले टाकत. केवळ दोन दिवसात या दोन्ही योजना जास्त जास्त नागरिकांपर्यंत पोचवून अधिक अधिक ग्राहक जोडण्याचा विक्रम केला आहे. यापुढेही या दोन योजनांसह अन्य योजनातही यापेक्षाही अधिक ग्राहक जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोस्ट मास्तर रामसिंग परदेशी आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. संदेश बैरागी यांच्याकडून सांगण्यात आले.

Nashik Division Head Post Office GPO
Nashik News : रामतीर्थाला गरज ‘Smart' महिला वस्त्रांतरगृहांची!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com