Nashik News : रामतीर्थाला गरज ‘Smart' महिला वस्त्रांतरगृहांची!

Ramtirtha
Ramtirthaesakal

नाशिक : देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे नाशिकचे रामतीर्थ. त्यामुळे येथे भाविकांचा वर्षभर राबता असतो. एकीकडे शहरात स्मार्टसिटीतंर्गत कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. परंतु, या ठिकाणी येणाऱ्या भाविक महिलांसाठी स्वच्छतागृहासह वस्त्रांतरगृहाची गरज मात्र दुर्लक्षित राहिली. (Ramtirtha needs Smart women changing room Nashik Latest Marathi News)

स्मार्टसिटीतंर्गत रस्ते सुशोभीकरणासह गटारींची कामे सुरू आहेत. रामतीर्थाचे धार्मिक महत्त्व मोठे असल्याने येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून धार्मिक विधीसाठी भाविक येतात. कुटुंबातील भाविकांमध्ये महिलांची संख्या मोठी असते. महिलांना रामतीर्थावर स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी आताच्या वस्त्रांतरगृहाच्या पहिल्या मजल्यावर जावे लागते. येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहने उभी असल्याने जाणे अडचणीचे होते. त्यामुळे आता स्मार्टसिटीच्या निधीतून रामतीर्थाजवळ महिलांसाठी स्वच्छतागृह व वस्त्रांतरगृह उभारता येईल काय अथवा वेगळी व्यवस्था करता येईल काय, याचा विचार भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाचा झाला आहे.

हरिद्वारच्या धर्तीवर रामतीर्थावरील आरतीसाठी सरकारने पाच कोटींची तरतूद केली असून नवीन वर्षांपासून महाआरतीचे नियोजन आहे. खरेतर दोन वर्षांपूर्वी पर्यटन विभागाच्या निधीतून रामतीर्थावरील महाआरतीसाठी काही लाखांची खरेदी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे ही महाआरती स्थगित झाली. तसे त्यासाठी खरेदी करण्यात आले साहित्य शोधण्याची वेळ आली आहे. आता पुन्हा पाच कोटींचा निधी येणार आहे. त्याच्या नियोजनाचा लांबल्याचा विचार होताना स्थानिक पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यावे लागणार आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

Ramtirtha
Nashik ZP News : जलजीवन कामप्रश्‍नी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यावर अन्याय

प्रश्‍न अनुत्तरीत

गंगा गोदावरी मंदिराशेजारील छोट्या जागेत महिलांसाठी वस्त्रांतरगृह होते. परंतु, रामतीर्थाच्या पूर्वेस सिंहस्थ काळात उभारण्यात आलेल्या दोन मजली इमारतीमुळे हे वस्त्रांतरगृह तोडण्यात आले. सध्या याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महिलांसाठी वस्त्रांतराची व्यवस्था आहे. मात्र या वस्त्रांतरगृहाची नेमकी काय अवस्था आहे हे कधी पाहिले जाणार, हा प्रश्‍न अनुत्तरीत राहतो.

"रामतीर्थ परिसरात मोठा खर्च करून विकासकामे सुरू आहेत. दुसरीकडे महिलांसाठी वस्त्रांतरगृह नसल्याने उघड्यावर कपडे बदलावे लागतात. ही लाजीरवाणी बाब आहे."

- भारती जाधव, पर्यावरणप्रेमी

"रामतीर्थाचे धार्मिक महत्त्व मोठे असल्याने इथे रोज शेकडो भाविक येतात. त्यात महिलांचे प्रमाण मोठे असते. परंतु त्यासाठी रामतीर्थालगत स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. त्याची पूर्तता केली जावी." - वैशाली चव्हाण, नाशिक

Ramtirtha
Super 50 Scheme : सुपर फिफ्टी योजनेची निविदा प्रक्रिया लांबणीवर?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com