Nashik Eknath Shinde : शिवसेनेला वाचविण्यासाठी धाडसी निर्णय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Nashik News : उद्धव ठाकरे यांचे सर्वसामान्य शिवसैनिकाला पालखीत बसविण्याचे स्वप्न होते, मात्र त्यांनी स्वतःच सत्तेच्या पालखीत उडी मारली.
Eknath Shinde
Eknath Shinde esakal

Nashik News : उद्धव ठाकरे यांचे सर्वसामान्य शिवसैनिकाला पालखीत बसविण्याचे स्वप्न होते, मात्र त्यांनी स्वतःच सत्तेच्या पालखीत उडी मारली. भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेनेची नैसर्गिक युती होती. मात्र, त्यांनी केलेला नवीन प्रयोग नैसर्गिक विचारसरणीच्या विरोधात होता. (entry ceremony held for supporters and former District Chief Vijay Karanjkar)

त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना वाचविण्यासाठी धाडसी निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगताना छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामकरणाविरोधी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यावर आता न्यायालयालाही गद्दार म्हणणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांना उद्देशून केला.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख व लोकसभा संघटक विजय करंजकर समर्थकांचा प्रवेश सोहळा बुधवारी (ता. ८) आयोजित करण्यात आला होता. या वेळी श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले, की ठाकरे कुटुंबीय नेहमी ‘किंगमेकर’च्या भूमिकेत राहिले; परंतु उद्धव ठाकरे यांना खुर्चीचा मोह झाला व त्यांनी अनैसर्गिक घटकांशी युती केली.

मुख्यमंत्रिपदावर बसल्यावर उद्धव ठाकरे यांनी घरात बसून व फेसबुकवरून काम केले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन करून मोठे पाप केले. सत्ता असतानाही शिवसैनिकांचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण झाले. त्यामुळे स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला. ५० आमदार आज माझ्याबरोबर आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणात शिवसेनेत पदाधिकारी व कार्यकर्ते येत आहेत. समोरची शिवसेना पूर्ण रिकामी झाली आहे. (latest marathi news)

Eknath Shinde
Nashik Loksabha: नाशिकवरून वरिष्ठ नेत्यात वाक्‌युध्द; NCPचे पटेल म्हणतात, नाशिक आमचेच! सेनेचे शिरसाठ म्हणतात, आग्रह नव्हे, हट्ट!

हे का होत आहे, याचे आत्मपरीक्षण केल्यास गद्दार कोण, हे समजेल. उद्धव ठाकरे हे महागद्दार आहेत. त्यांच्या गद्दारीमुळेच त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. आम्हाला ज्यांनी संपविण्याचा घाट घातला, त्यांचाच आम्ही ‘करेक्ट कार्यक्रम’ करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मार्ग शोधला. आम्ही सरकारमधून बाहेर पडलो, त्या वेळेस पळून गेलो नाही. फोनवर बोलत-बोलत गेलो.

उद्धव ठाकरे यांना भाजपच्या पाच नेत्यांना जेलमध्ये टाकायचे होते व भाजपचे २५ आमदार फोडून महाविकास आघाडीत समाविष्ट करायचे होते. त्या वेळी आम्ही साथ सोडण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे हे घरगडी समजतात. त्यांचा मानसन्मान राखला जात नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे, गणेश नाईक, रामदास कदम, मनोहर जोशी या मास बेस लीडरला उद्धव ठाकरे यांनी संपविण्याचा प्रयत्न केला.

कोणाला मोठे होऊ दिले नाही. म्हणून आज त्यांची अशी अवस्था असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. पालकमंत्री दादा भुसे व महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचीही या वेळी भाषणे झाली. नव्याने प्रवेश केलेल्या विजय करंजकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात निष्ठेची चेष्टा होत असल्याचे सांगितले. सुरवातीला लोकसभेसाठी मला शब्द दिला, दीड वर्ष तयारी केल्यावर शब्द फिरविल्याचे सांगितले.

Eknath Shinde
Nashik Loksabha: शिंदे यांच्या आग्रहामुळे भुजबळांनी केली तलवार म्यान

पराभव दिसत असल्याने देशाचे संविधान बदलणार असल्याची अफवा विरोधकांकडून पसरवली जात असल्याचे ते म्हणाले. या वेळी व्यासपीठावर आमदार सुहास कांदे, उपनेते अजय बोरस्ते, संपर्क नेते सूर्यकांत लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते.

गोडसेंना मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या

उद्धव ठाकरे यांनी सामान्य शिवसैनिकाला मोठे होऊ दिले नाही, हाच धागा पकडत मुख्यमंत्री शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, की ज्या लोकांनी मदत केली, त्या लोकांना विसरू नये, त्यांची कामे केली पाहिजेत. कोणाचा अपमान होईल, अशी कामे होऊ नयेत. कार्यकर्त्यांची कामे झाली पाहिजेत, तोच तुमचा दुवा आहे.

त्यांचे फोन उचलत जा, अडचणीत उभे राहा. मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला दिलेला शब्द पाळला. नाशिक मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निश्चित होण्यास विलंब झाल्याचा उल्लेख करताना हेमंतआप्पा मैदानाबाहेर गेले; परंतु त्यांचे नशीब चांगले आहे. पुन्हा ते आता मैदानात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगताच त्यांच्यासह सभागृहात हशा पिकला.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात (एकूण ३७ मिनिटे)

- मोदी व देश विकास- ५ मिनिटे.

- संविधान बदल- २ मिनिटे.

- शिवसेना संघटना- १२ मिनिटे.

- उद्धव ठाकरे- १८ मिनिटे.

Eknath Shinde
Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com