Nashik News : लग्नसराईमध्ये नवीन संसार महागला; भांडे बाजारात ‘कही खुशी कही गम’

Nashik : जिल्हाभरात लग्नसराईची धूम सुरू आहे. ६ मे ते १२ जून या कालावधीत अस्त असल्याने लग्नतिथी नाहीत.
shop
shop esakal

Nashik News : जिल्हाभरात लग्नसराईची धूम सुरू आहे. ६ मे ते १२ जून या कालावधीत अस्त असल्याने लग्नतिथी नाहीत. त्यामुळे लग्नांची धूम सुरु असून येथील भांडे बाजारातही उलाढाल वाढली आहे. मात्र काळानुसार आहेराच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे भांडे बाजाराची उलाढाल कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वीस टक्के व्यवसायात घट झाली आहे. स्टील व ॲल्युमिनिअमच्या किमतीत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली असल्याने त्याचा फटकाही काही प्रमाणात भांडे व्यवसायाला बसला आहे. (price of steel and aluminum increased by ten to fifteen percent )

नवीन संसार महागला असून भांडे बाजारात ‘कही खुशी कही गम’ असे चित्र आहे. दुष्काळी परिस्थिती असली तरी कसमादेसह जिल्ह्यात धुमधडाक्यात लग्न होत आहेत. बाजारात सोने, कपडे, भांडे, फुलहार, किराणा यासह विविध वस्तु खरेदीसाठी गर्दी होत आहे. येथे भांडे व्यवसाय लग्न सोहळ्यामुळे काही प्रमाणात बहरला.

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून लग्न सोहळ्याच्या खर्चात दुप्पटीने वाढ झाली आहे. सोने, भांडे व इतर वस्तूंच्या किमतीत दुप्पटीने वाढ झाली आहे. लग्नात आहेर म्हणून हंडा, टीप, कळशी, स्टील मांडणी, ताट, तांब्या, ग्लास आदी वस्तु देण्याच्या प्रथा आहेत. अनेक कुटुंबीय लग्नात आहेर स्वीकारत नाहीत. त्यामुळे भांडे व्यवसायावर त्याचा परिणाम होवू लागला आहे. (latest marathi news)

shop
Nashik News : गांधीगिरी करत महिलांनी बंद पाडला बिअर बार

बाजारात नवीन स्टील २०० ते ५०० रुपये किलोने व ॲल्युमिनिअम ३१५ ते ४२५ रुपये किलोने मिळत आहे. यात स्टीलची मोड ही ६० रुपये किलोने तर ॲल्युमिनिअम १६० रुपये किलोने विक्री होत आहे. दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे संसाररुपी वस्तुंच्या किमती महाग होत आहे. येथे भांडे विक्री करणारी शेकडो दुकाने आहेत. स्टीलची भांडी इंदोर, दिल्ली येथून तर ॲल्युमिनिअमची भांडी मुंबई, पुणे, अहमदाबाद, राजकोट येथून येत आहे.

भंगार वस्तुच्या मोबदल्यात भांडी

शहरात भंगार खरेदी करण्यासाठी हजारो व्यावसायिक कसमादे परिसरात जातात. अनेक व्यावसायिक भांडे विक्री करतात. सध्या भंगार विकून त्या बदल्यात भांडे खरेदीचा फंडा ग्रामीण भागात रुजला आहे. शहरातील झोपडपट्टी व ग्रामीण भागात काही व्यावसायिक छोट्या रिक्षांमध्ये भांडे भरुन गल्ली मोहल्ल्यातून विक्री करतात. काही व्यावसायिक हप्त्याने देखील भांडे विक्रीचा व्यवसाय करतात.

''गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा भांडे व्यवसायाला पाहिजे तशी विक्री होत नाही. व्यवसाय जवळपास निम्म्याने घटला. शहरात मंदी व कसमादे परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने त्याचा फटकाही बसला. अनेक कुटुंबीय लग्नांमध्ये भांड्यांऐवजी रोखस्वरुपात आहेर करीत असल्याचा परिणामही व्यवसायावर झाला आहे.''- गौरव अंधारे संचालक, शिवम मेटल्स, भांडे बाजार

shop
Nashik News : भीक मागणाऱ्या मुलांची संख्या वाढल्याने अपघातांत वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com