Nashik Traffic Problem : शहरातील वाहतूक विस्कळित; वाहतूक शाखेकडून पर्यायी मार्गांचे नियोजन

Traffic Problem : स्मार्ट रोड वाहतुकीसाठी बंद असल्याने पर्यायी मार्गांवरही वाहतूक विस्कळित झाली आहे.
traffic (file photo)
traffic (file photo)esakal

Nashik Traffic Problem : आदिवासी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात अद्याप तोडगा न निघू शकल्याने ते लांबण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे स्मार्ट रोड वाहतुकीसाठी बंद असल्याने पर्यायी मार्गांवरही वाहतूक विस्कळित झाली आहे. (Nashik Problem of Traffic in city due to adivasi morcha marathi news)

त्यामुळे शहर वाहतूक शाखेने नव्याने पर्यायी वाहतुकीचे नियोजन केले असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे. माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

यामुळे अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नल या दरम्यान वाहतूक विस्कळित झाली असून पर्यायी मार्गांवरही वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी वाहतूक मार्गात बदल केले असून, १ ते २ मार्च रोजी कालावधीत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नल वाहतुकीसाठी बंद राहील. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचे नियोजन केले आहे. (latest Marathi News)

traffic (file photo)
Traffic Problem : शहादा-शिरपूर महामार्गावरील काम कासवगतीने

पर्यायी मार्ग

- सारडा सर्कल ते शालिमारकडे येणारी वाहतूक ही खडकाळी सिग्नलमार्गे मोडक सिग्नल, जलतरण तलाव सिग्नलमार्गे इतरत्र वळविण्यात आली आहे.

- मोडक सिग्नलकडून येणारी वाहतूक सीबीएस सिग्नल येथून डावीकडे वळण घेऊन टिळकवाडी सिग्नलकडे मार्गस्थ

- गंगापूर रोडने रविवार कारंजाकडे व पंचवटीकडे येणारी वाहतूक जनावरांचा दवाखाना ते घारपुरे घाटाने अशोकस्तंभ मार्गे रामवाडी पुलावरून पंचवटीकडे मार्गस्थ.

- पंचवटीकडून रविवार कारंजाकडे व पंचवटीकडे येणारी वाहतूक मालेगाव स्टॅन्ड येथून मखमलाबाद नाका-रामवाडी मार्गे चोपडा लॉन्सकडे मार्गस्थ

- कॅनडा कॉर्नरकडून सिबीएसकडे येणारी वाहतूक राणे डेअरी - मॅरेथॉन चौकमार्गे, तसेच टिळकवाडी, रामायण बंगला, जलतरण सिग्नलमार्गे मार्गस्थ.

traffic (file photo)
Nashik Traffic Problem: ट्रॅव्हल बसमुळे नाशिक रोडला वाहतूक कोंडी

आयुक्तांनी घेतली भेट

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुरुवारी (ता. २९) दुपारी आदिवासी आंदोलकांची भेट घेत संवाद साधला. या वेळी आंदोलकांना उद्भवणाऱ्या अडचणीही जाणून घेत, त्यानुसार जादा पाणी आणि स्वच्छतागृहाची सुविधा पुरविण्यात आल्या. यासंदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचीही भेट घेऊन चर्चा केली. या वेळी पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

traffic (file photo)
Nashik Traffic Problem : स्पीड गनची वसुली जोरात, मात्र वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष; जिल्हा वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com