Nashik Traffic Problem : स्पीड गनची वसुली जोरात, मात्र वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष; जिल्हा वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

जिल्हा वाहतूक शाखा स्पीड गनची दंड वसुली मोहीम तासन्‌तास करते. मात्र, त्यांचे दहाव्या मैलावर रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
A speed gun vehicle parked at the foot of the flyover on the Agra highway. In the second photo, the traffic jam at Tenth Mile Junction.
A speed gun vehicle parked at the foot of the flyover on the Agra highway. In the second photo, the traffic jam at Tenth Mile Junction.esakal

Nashik Traffic Problem : जिल्हा वाहतूक शाखा स्पीड गनची दंड वसुली मोहीम तासन्‌तास करते. मात्र, त्यांचे दहाव्या मैलावर रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

गती नापण्यात तत्परता दाखविली जाते, ती वाहतूक सुरळीत करताना का नाही दाखवत, असा संतप्त सवाल त्रस्त वाहनधारक विचारू लागले आहेत. (Recovery of speed gun is loud but traffic congestion is ignored by District Transport Branch nashik news)

महामार्ग म्हटला, की गाड्या आणि वेग यांची युती अभेद्य आहे. वेगाचे नियम आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर दहाव्या मैलजवळ जनार्दन स्वामी आश्रमपासून पिंपळगाव बसवंतपर्यंत वाहतूक शाखेची जोरदार वसुली मोहीम सुरू असते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. नाशिक शहरात येताना सहापदरी महामार्ग किंवा उड्डाणपुलाच्या पायथ्याशी स्पीड गन उभी करून जोरदार वसुली सुरू असते.

चढ असल्याचे लक्षात आल्याबरोबर वाहनांचा वेग सरासरीपेक्षा अधिक असतो. हा न्यूटनचा नियम असून, तेच हेरत ऑनलाईन पावती फाड मोहीम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने सपाट महामार्ग आणि नियम लावलेल्या ठिकाणापासून काही किलोमीटरवर वसुली करावी. जेणेकरून सामान्य वाहनधारकांना त्रास होणार नाही, असे वाहनधारकांमध्ये बोलले जात आहे.

A speed gun vehicle parked at the foot of the flyover on the Agra highway. In the second photo, the traffic jam at Tenth Mile Junction.
Nashik Traffic Problem: ट्रॅव्हल बसमुळे नाशिक रोडला वाहतूक कोंडी

पोलिस दादा इतका वेळ दहाव्या मैलाला द्या!

सध्या नाशिकहून मालेगावकडे जाणाऱ्या वाहनधारक दहाव्या मैलावर होणाऱ्या मोठ्या वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. कधी कधी अर्धा तास वाहतूक कोंडी होऊन लांब रांगा लागतात. वाहतूक शाखेचे कर्मचारी कोंडीवेळी हजर नसतात. वाहतूक सुरळीत ठेवणे, हे प्रथम कर्तव्य असताना, तासन्‌तास गाडीत बसून स्पीड गन हाताळून ड्यूटी करण्याचे धोरण चुकीचे असल्याचे मत वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या नागरिकांनी व्यक्त केले.

आडगाव उड्डाणपुलावर अपघाताची शक्यता

मेडिकल कॉलेजपासून पुढे सुरू झालेल्या उड्डाणपुलावर नाशिककडे जाताना रासबिहारीच्या चढ्याजवळ, तर ओझरकडे येताना लोकमान्य हॉस्पिटलसमोरच्या कट ठिकाणी चार ते पाच पोलिस आणि स्पीड गन वाहन धडकी भरवणाऱ्या स्थितीत उभी असते. त्यामुळे लहान वाहनधारकांच्या जीवावर बेतू शकते.

अशातच ठरवलेली वेग मर्यादा वाढल्यावर जुनाच सूचना फलक आहे. स्पीड व्हॅनजवळ वाहनधारक थांबलाच, तर त्याला तोंडी नियम सांगितले जातात. यामुळे दंड वसुली पोलिसांनी ठिकठिकाणी वेगमर्यादा फलक लावावेत. मगच दंड आकरावेत, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

A speed gun vehicle parked at the foot of the flyover on the Agra highway. In the second photo, the traffic jam at Tenth Mile Junction.
Nashik Traffic Problem: शहराला वाहतूक कोंडीचा विळखा! नाशिककरांच्या डोक्याला ताप; जागोजागी वाहतूक कोंडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com