Nashik Industrial News : जिल्ह्यात 164 नव्या उद्योगात उत्पादन सुरू; हजारपेक्षा जास्त कामगारांना मिळाला रोजगार

Nashik Industrial : औद्योगिक वसाहतींमध्ये गेल्या वर्षभरात १६४ उद्योगांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेऊन नवीन उद्योगांत उत्पादन सुरू केले आहे.
industry
industryesakal

Nashik Industrial News : सातपूर, अंबडसह जिल्हाभरातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये गेल्या वर्षभरात १६४ उद्योगांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेऊन नवीन उद्योगांत उत्पादन सुरू केले आहे. यामुळे हजारावर लोकांना प्रत्यक्ष, तर किमान दहा हजार लोकांना अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळाला. (Nashik Production started in 164 new industries in district marathi news)

‘एमआयडीसी’कडून भूखंड वाटप झाल्यावर तीन ते चार वर्षांत त्यावर बांधकामाची परवानगी घेऊन पूर्णत्वाचा (बीसीसी) दाखला घेणे बंधनकारक असते. तसे न केल्यास वाटप केलेला भूखंड एमआयडीसी परत घेण्याची प्रक्रिया सुरू करते. या वेळी भूखंडापोटी भरलेली रक्कमही जप्त करण्यात येते, त्यामुळे संबंधितांनी भूखंड ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम करणे बंधनकारक असते.

पूर्वीही हा नियम होता; पण त्याची फारशी अंमलबजावणी करीत नसल्याने, राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांशी संबंधित असल्याने अनेक भूखंड हे पडून राहत होते. गेल्या पाच वर्षांत सुधारित उद्योग धोरणानुसार या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालय स्तरावरून देखरेख केली जाते.

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील औद्योगिक विकास महामंडळाने अनेक नववसाहती स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादनाची प्रक्रिया राबविली. त्यात मालेगाव, अजंग, येवला, विंचूर, दिंडोरी, पेठ या ठिकाणी नवीन वसाहती स्थापन झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील भूखंडाचे वाटप करण्यात आले. त्यातील काहींनी भूखंड घेऊन फक्त रिकामे ठेवले आहेत. (latest marathi news)

industry
Nashik Industrial Investment: औद्योगिक गुंतवणूकीत नाशिक पुन्हा कोरडेच! मुंबई, पुणे आणि संभाजीनगरलाच महत्व

काहींनी एमआयडीसी विभागाकडून परवानगी घेऊन बांधकामाला सुरवात केली; तर काहींनी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेत आपले उद्योग थाटले आहेत. सातपूर, अंबड या जुन्या वसाहतीमधील काही बंद पडलेल्या कंपन्यांचे भूखंडाचे तुकडे पाडून लघुउद्योगांना विक्री करीत त्यावर रीतसर परवानगी घेत उद्योग उभारले जात आहेत. गेल्या वर्षभरात शेकडो उद्योजकांनी कोट्यवधीची गंगाजळी गुंतवत प्रत्यक्षात उद्योग उभारले आहेत, यामुळे जिल्ह्यातील अर्थचक्राला गती मिळाली आहे.

ठिकाण- बांधकाम पूर्ण

सातपूर- ७७

अति. दिंडोरी- ६

दिंडोरी- २

पेठ- ३

अंबड- ६४

मालेगाव- ३

अति. विंचूर- ५

विंचूर- ४

industry
Nashik Industrial Highway: नाशिक पुणे दरम्यान नवीन औद्योगिक महामार्ग! रस्ते विकास महामंडळाच्या प्रस्तावास शासनाची मंजुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com