Nashik Industrial Investment: औद्योगिक गुंतवणूकीत नाशिक पुन्हा कोरडेच! मुंबई, पुणे आणि संभाजीनगरलाच महत्व

Industrial Investment
Industrial Investmentesakal

Nashik Industrial Investment : उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बुधवारी (ता. २८) झालेल्या बैठकीत राज्यातील विविध भागांसाठी ४० हजार कोटींच्या गुंतवणूकीच्या व सुमारे सव्वा लाख रोजगार निर्मितीच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.

पण, यामध्ये नाशिक मात्र पुन्हा एकदा कोरडेच राहिले आहे. (ignorance to Nashik again in industrial investment Only Mumbai Pune and Sambhajinagar important preferred nashik)

या बैठकीत नाशिकसाठी कुठल्याही प्रकल्पाची घोषणा झालेली नाही. मुंबई, मराठवाड्यासह इतर भागांसाठी गुंतवणूक प्रकल्पांची घोषणा बघता, नाशिकलाही किमान नंदुरबारप्रमाणे एखाद्या मोठ्या प्रकल्पास मान्यता मिळणे अपेक्षित होते.

प्रत्यक्षात मात्र, नवी मुंबईत जेम्‍स ॲण्ड ज्‍वेलरी पार्कला, तर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे १२ हजार कोटींच्या देशातील पहिल्या इलेक्ट्रीक व्हेईकल आणि बॅटरी उत्पादनांच्या प्रकल्पाची घोषणा झाली.

मुंबईत ज्वेलरी पार्कसाठी २० हजार कोटीच्या प्रकल्पाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यात, हिरे उत्पादनासह विविध निर्यातक्षम दागिने उत्पादनांना चालना दिली जाणार आहे. तर पुणे आणि संभाजीनगर भागातील गुंतवणूक प्रकल्पांत इलेक्ट्रिक व्हेईकल आणि बॅटरी उत्‍पादन होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Industrial Investment
NMC Hoarding Audit : शहरात धोकादायक होर्डिंगची शोधमोहीम; 3 संस्थांवर जबाबदारी

त्यात बॅटरी निर्मितीसह इलेक्ट्रीक वाहनांच्या विविध भागांचे उत्पादन होणार आहे. थोडक्यात, मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर भागातील प्रकल्पांत एकुण तीस ते पस्तीस हजार कोटींच्या आसपास गुंतवणूक होणार आहे.

असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांसह अनेक घोषणा झाल्या. मात्र, नाशिकला कुठल्याही उद्योगाची घोषणा झालेली नाही. सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींत आजमितीस अनेक कंपन्या बंद आहेत.

त्यांच्या जागा तशाच पडून आहेत. मात्र, येथे कुठलाही मोठा औद्योगिक प्रकल्प प्रस्तावित नसल्याने औद्योगिक गुंतवणुकीच्या विषयात नाशिक कोरडेच राहिल्याची खंत नाशिककर व्यक्त करत आहेत.

Industrial Investment
NMC School Uniform: मनपा विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा विषय मार्गी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com