Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक कर्मचाऱ्‍यांचे धरणे आंदोलन; पैसे देणाऱ्‍यांचीच बिले मंजूर होत असल्याचा आरोप

Nashik News : जिल्ह्यातील विविध माध्यमिक कर्मचारी संघटनांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले.
During the agitation, z. p. secondary staff.
During the agitation, z. p. secondary staff.esakal

Nashik News : २०१९ पासून प्रलंबित वेतन फरकाची बिले, पुरवणी बिले वेतन पथक अधिक्षक कार्यालय मंजूर करत नाही. जे कर्मचारी पैसे देतात त्यांचीच वेतन फरकाची बिले काढली जात असल्याचा आरोप करीत जिल्ह्यातील विविध माध्यमिक कर्मचारी संघटनांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले. (protest by Zilla Parishad Secondary Staff)

या वेळी त्यांनी वेतन पथक तथा भविष्य निर्वाह निधी अधिक्षक नितीन पाटील यांना निलंबित करण्याची मागणी केली. जिल्ह्यातील माध्यमिक कर्मचाऱ्‍यांची चार पास वर्षांपासून वेतन फरकाची बिले, पुरवणी बिले, अनुदानित कर्मचाऱ्‍यांची वेतन फरकाची बिले, रिटायर्ड कर्मचाऱ्‍यांची बिले, पीएफची हप्ते, मेडीकल बिले.

सातव्या वेतन आयोगाचा जमा झालेला तिसरा, चौथा हप्ता मार्चअखेर कर्मचाऱ्‍यांच्या खात्यावर जमा होणे अनिवार्य आहे. मात्र, ही बिले अद्यापपावेतो जमा झालेली नसल्याने माध्यमिक कर्मचाऱ्‍यांमध्ये असंतोष आहे. संतप्त कर्मचाऱ्यांनी माध्यमिक विभाग कार्यालयावर धडक मारत कार्यालयात ठिय्या धरणे आंदोलन केले.

या वेळी माध्यमिक कर्मचाऱ्‍यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्‍यांकडे वेतन पथक अधिक्षक नितीन पाटील यांना त्वरित निलंबित करण्याचे यावी, अशी आग्रही मागणी केली. वेतन अधिक्षक यांच्यासोबत बैठक होऊनदेखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (latest marathi news)

During the agitation, z. p. secondary staff.
Nashik News : तिकीट आरक्षित करूनही कुचंबणा; रेल्वेगाड्यांत आरक्षण केलेल्या प्रवाशांची धावपळ

त्यानंतर वेतन अधिक्षक, कर्मचारी संघटना आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यात फरक बिले मंजूर करण्यासंदर्भात बैठक होऊन देखील वेतन अधीक्षकांनी बिले मंजूर केली नाही. माध्यमिक शिक्षणाधिकारी वेतन अधीक्षकांना पाठीशी घालत आहेत. जे कर्मचारी पैसे देतात त्यांचीच बिले मंजूर करण्यात येतात.

त्यांची बिले ऑनलाइन मंजूर केली जातात असे आरोप कर्मचारी संघटनांनी या वेळी केले. आंदोलनात मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष गोरख कुणगर, बाळासाहेब सोनवणे, पुरुषोत्तम रकिबे, रोहित गांगुर्डे, विजय बडे, त्र्यंबक मार्कंड, क्रांती देवरे यांसह मुख्याध्यापक संघ, टीडीएफ महाराष्ट्र विकास शिक्षक संघटना.

महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटना, जुनी पेन्शन संघटना, शिक्षक परिषद संघटना, ज्युनिअर कॉलेज शिक्षक शिक्षकेतर संघटना, शिक्षक भारती शिक्षकेतर संघटना अशा विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

During the agitation, z. p. secondary staff.
Nashik Unseasonal rain News : नांदुरी, सप्तशृंगगड परिसरास वादळासह पावसाने झोडपले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com