Nashik News : गो सेवा समितीतर्फे जनावरांच्या पाण्याची सोय! कळवण शहरात ठिकठिकाणी बसविल्या सिमेंटच्या टाक्या

Nashik News : शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांसाठी कळवण तालुका गो सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत.
A cow drinking water in a tank maintained by Go Seva Samiti.
A cow drinking water in a tank maintained by Go Seva Samiti.esakal

कळवण : शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांसाठी कळवण तालुका गो सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत. यामुळे मोकाट जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. गो सेवा समितीच्या उपक्रमांचे कळवणकरांनी कौतुक केले. दुष्काळाच्या झळा धरणांचे माहेर घर असलेल्या कळवण तालुक्यालाही जाणवू लागल्या आहेत.

पाण्याचे स्रोत आटले आहेत. पहिल्यांदाच कळवण शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते, ही बाब हेरून कळवण तालुका गो सेवा समितीने शहरात ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवून त्यात पाणी सोडले आहे. यामुळे मोकाट जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. (Nashik Provision of water for animals by Go Seva Samiti kalawan news)

पाण्याच्या टाक्या बसविण्यासाठी गो सेवा समितीचे अध्यक्ष सागर पगार, सचिव महेश काकुळते, खजिनदार महेंद्र पगार, उपाध्यक्ष अमित निकम, गो सेवा समिती सदस्यांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांना नगराध्यक्ष कौतिक पगार, शिवस्मारक समिती अध्यक्ष भूषण पगार, महाराजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सतीश पगार, कळवण बाजार समितीचे संचालक योगेश शिंदे, मजूर फेडरेशनचे चेअरमन रोहित पगार, डॉ. दीपक शेवाळे, शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष मनोज पगार, कळवणचा राजा मित्रमंडळ, भगवती प्रतिष्ठान, प्रमोद रौंदळ, ॲड. विनायक पगार, मनोज पगार, चेतन निकम, टिनू पगार, सूरज पगार, निकिता साडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या ठिकाणी ठेवल्या पाण्याची टाक्या

छत्रपती शिवाजी महाराजनगर, गांधी चौक, गणेशनगर, मार्केट कमिटी, बाजार पट्टी, बेहडी नदीजवळ, श्रीरामनगर, श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, सब स्टेशन रोड आदी. (latest marathi news)

A cow drinking water in a tank maintained by Go Seva Samiti.
Nashik News : खमंग ढोकळ्याच्या पायी विक्रीतून सुटतोय पोटाचा प्रश्न! नरकोळ जाखोड परिसरात चंदनसिंगची चिमुकले पाहतात वाट

"उन्हाची तीव्रता लक्षात घेता कळवण शहरातील गोमाता व मुक्या प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणे गरजेचे होते. गो सेवा समितीच्या संकल्पनेतून कळवण शहरात विविध ठिकाणी गोमाता व मुक्या प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या."

-सागर पगार, अध्यक्ष, गो सेवा समिती, कळवण

"शहरातील जनावरांना अनेक व्याधींनी ग्रासले आहे. या सर्व जनावरांच्या उपचाराचा खर्च गो सेवा समिती उचलत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, म्हणून तालुक्यातील जनतेने पशु, पक्षी, इतर प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची व्यवस्था करावी."

-गो सेवा समिती, कळवण तालुका

कळवण शहरात एकूण जनावरांची संख्या

-अंदाजे ४०० ते ५००

-एकूण सिमेंट टाक्या : १५

-एकात टाकी बसते २५० लीटर पाणी

-एक दिवसाला लागते ३७५० लीटर पाणी

A cow drinking water in a tank maintained by Go Seva Samiti.
Nashik Water Supply News : पिंपळगावचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार : सरपंच भास्करराव बनकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com