

Nashik 62 Acre PTC Land Dispute District Report Flags ULC Order Changes And 98393 Sq Meter Difference In Land Records
sakal
नाशिक : त्र्यंबक रोडवरील पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात नागरी जमीन कमाल धारणा कायद्यातून (यूएलसी) अतिरिक्त जमीन वाचविण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने आदेशांमध्ये फेरबदल करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालातून समोर आले आहे. टंकलेखनातील चूक दुरुस्तीच्या नावाखाली हजारो चौरसमीटर अतिरिक्त जमीन कमी दाखवून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.