Nashik Pune Highway : अवजड वाहनांची वाहतूक सोयीपेक्षा गैरसोयीचीच; वळविलेल्या वाहतुकीने अपघाताचे प्रमाण वाढले

Nashik Pune Highway : नाशिक-पुणे महामार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर व फेम थिएटर येथील दोन्ही सिग्नलच्या येथून रिंग रोडने अवजड वाहनांची वाहतूक वळविण्यात आलेली आहे.
Traffic on Nashik-Pune highway.
Traffic on Nashik-Pune highway.esakal

Nashik Pune Highway : नाशिक-पुणे महामार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर व फेम थिएटर येथील दोन्ही सिग्नलच्या येथून रिंग रोडने अवजड वाहनांची वाहतूक वळविण्यात आलेली आहे. यामुळे द्वारका चौकात होणारा ट्रॅफिक जाम हा काही प्रमाणात तरी कमी झाला आहे. मात्र रिंगरोडमार्गे वळविण्यात आलेल्या अवजड वाहनांमुळे अनेक अपघात घडत आहे. गेल्या दोन वर्षात फेम थिएटर येथून अवजड वाहने वळविल्यामुळे रिंगरोडवर सहा नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. (Nashik Pune Highway Transport of heavy vehicles is an inconvenient marathi news)

तसेच वडाळामार्गे मुंबईकडे जाणाऱ्या रिंगरोडवरही अशाच प्रकारचे अपघात झाले आहे व त्यामध्येही जीवितहानी झालेली आहे. ज्या रिंगरोडमार्गे अवजड वाहने प्रवास करतात ते रस्ते यामुळे खराब होत आहेत. सध्याचे रिंगरोड हे पूर्वीचे कॉलनी रोड होते. त्यामुळे त्या रस्त्यांची क्षमता ही अवजड वाहनांची वजन पेलवणारी नाही. तेथे थेट सिमेंटचे रस्ते आवश्यक आहे.

म्हणूनच प्रशासनाने रिंगरोडवरील रस्त्यांचा दर्जा सुधारण्याची आवश्यकता आहे. डॉ. आंबेडकरनगर सिग्नलमार्गे मुंबईला जाणारे अवजड वाहने त्यामार्गे वळविण्यात येतात, तर फेम थिएटरच्या सिग्नलवरून छत्रपती संभाजीनगर-धुळे व सुरत येथे जाणारी वाहने वळविली जातात. त्यामुळे मुंबईमार्गे जाताना इंदिरानगर, लेखानगर येथील रहिवाशांना अवजड वाहनांमुळे भयंकर समस्यांना तोंड द्यावा लागत आहे.

परराज्यातून येणाऱ्या अवजड वाहनांना सुरवातीस प्रवास करताना हे रिंगरोड लक्षात येत नाही. त्यामुळे ही वाहने कुठेही भरकटतात, यासाठी दिशादर्शक बोर्ड असणे आवश्यक आहे. मनपाच्या माध्यमातून जे दिशादर्शक बोर्ड लावलेले आहेत त्या दिशादर्शक बोर्डावरच राजकीय पुढाऱ्यांचे वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फ्लेक्स लावले जातात. त्यामुळे बाहेरगावची वाहने भरकटतात.

यासाठी वाहतुकीचे फेरनियोजन करून द्वारका चौक, इंदिरानगर बोगदा व लेखानगर येथे वाहतुकीचे नियोजन होणे आवश्यक आहे. जेणेकरून मुंबई-सुरत-धुळे-आग्रा-इंदोर येथे जाणारी अवजड वाहने ही थेट शहराच्या बाहेरून जातील, अशी व्यवस्था केली जावी. (latest marathi news)

Traffic on Nashik-Pune highway.
Nashik Industrial Highway: नाशिक पुणे दरम्यान नवीन औद्योगिक महामार्ग! रस्ते विकास महामंडळाच्या प्रस्तावास शासनाची मंजुरी

महत्त्वाची मुद्दे

- रिंगरोड भरनागरी वस्तीतून व स्लम भागातून जातात

- संबंधित रस्त्यांवर शाळा व महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणावर

- रस्त्यांची क्षमता अवजड वाहनांचे वजन पेलवणारी नाही

- दिशादर्शक फलक नाही, जे आहे त्यावर राजकीय शुभेच्छांचे फलक आहे

- गतिरोधक नसल्यामुळे वेगमर्यादा व नियंत्रण नाही

''नाशिकमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला पाहिजे. आम्ही वारंवार अवजड वाहनांची वाहतूक यावर आंदोलने केलेली आहे. मात्र फक्त आश्वासन मिळाले, अंमलबजावणी झाली नाही. ड्रीम सिटीमार्गे जाणारी अवजड वाहतूक ही तपोवनमार्गे न्यावी.''- राहुल दिवे, माजी नगरसेवक

''अवजड वाहनांच्या वळविलेल्या वाहतुकीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मुळात शासनाने वाहतुकीच्या नियोजनाचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे गरजेचे आहे. द्वारका ते दत्त मंदिर हा प्रस्तावित उड्डाणपूल झाला, तर वाहने उड्डाणपुलावरून जातील व वाहतूक कोंडी होणार नाही.''- जीवन शिंदे, संचालक- पवन मोटर्स

Traffic on Nashik-Pune highway.
Pune Nashik highway : पुणे नाशिक महामार्गावर वाहनांची धडक बसून चार दिवसात दोन कोल्ह्याचा बळी; वन विभागाला जाग कधी येणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com