MLA Amol Khatal
sakal
संगमनेर: ‘नाशिक–पुणे रेल्वे संगमनेरमार्गे गेलाच पाहिजे’, अशी ठाम भूमिका घेत आमदार अमोल खताळ यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादम्यान विधानभवनाबाहेर अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डोक्यावर फलक धरून आंदोलन केले. त्यांचे निदर्शन सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.