

Nashik Pune Railway Project Faces Fresh Confusion With 95 Hectares Land Acquisition Before Kakodkar Committee Report
sakal
नाशिक रोड: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाच्या मूळ मार्गाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी ६० दिवसांची मुदत असतानाच रेल्वे मंत्रालयाने नाशिक रोड-शिर्डी या ९५ किलोमीटरच्या दुहेरी रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. राहता व कोपरगाव तालुक्यांतील आठ गावांमधील तब्बल ९५ हेक्टर जमीन संपादित करण्याची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याने नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या भवितव्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.