
महाराष्ट्रात पाऊस दाखल झाला आहे. नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. सिन्नर तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहे. वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अशातच सिन्नर बसस्थानकात एक मोठी घटना घडली आहे.