नाशिक: शहर व परिसरात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी (ता. १३) पाऊस परतला, मात्र तो नुसताच भुरभूर स्वरूपात होता. ग्रामीण भागात दमदार पावसाची प्रतीक्षा असून, शेतकरी त्याकडे डोळे लावून बसले आहेत. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’ दिला आहे.