Nashik Ram Navami 2024: रामनवमी मिरवणुकीमुळे नाशिकरोडला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त! वाहतूक मार्गात हे आहेत बदल

Nashik News : पंचवटीप्रमाणेच, नाशिकरोड परिसरातही रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
Ram Navami Miravnuk Nashik Road police
Ram Navami Miravnuk Nashik Road policeesakal
Updated on

Nashik Ram Navami 2024 : पंचवटीप्रमाणेच, नाशिकरोड परिसरातही रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गेल्यावर्षी याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे यावेळी पोलिसांनी सतर्कता बाळगली असून कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करताना वाहतूक मार्गात बदल केला आहे. (Nashik Ram Navami 2024 Procession Nashik Road will heavily police surveillance changes in transport route marathi news)

नाशिकरोड येथील बुधवारी (ता. १७) रामनवमी निमित्ताने मुक्तिधाम मंदिरापासून दुपारी तीन वाजता मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. रामजन्मोत्सवामुळे निघणारी मिरवणूक मुक्तीधाम मंदिर, बिटको चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन, सुभाष रोड, सत्कार पॉईंटकडून देवळाली गाव मार्गे मुक्तिधाम मंदिर असा या मिरवणुकीचा मार्ग आहे.

या मिरवणुकीमध्ये २० ते २५ हजार भाविक सहभागी होत असल्याने या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनानुसार बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

यात परिमंडळ दोनचे उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्यासह नाशिकरोड, देवळाली कॅम्प, उपनगर व इंदिरानगर पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकार्यांसह २५० पोलीस, राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे, मिरवणुकीमुळे परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. हे बदल बुधवारी (ता. १७) दुपारी तीन ते रात्री मिरवणूक संपेपर्यंत जारी राहतील. तरी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे. (latest marathi news)

Ram Navami Miravnuk Nashik Road police
Nashik Ram Navami 2024: रामनवमीनिमित्ताने शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त! शुक्रवारी रामरथ मिरवणूक; वाहतूक मार्गातही बदल

प्रवेश बंद मार्ग

- सत्कार पॉईंट ते बिटको सिग्नल लेनवरील वाहतूक बंद

- रेल्वे स्टेशनकडून सत्कार पॉईंटकडे जाणार्या लेनवर वाहतूक बंद

- दत्त मंदिर सिग्नल - बिटको चौक मार्गे रेल्वेस्टेशनकडे जाणारी वाहतूक बंद

- डॉ. आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशनकडून सत्कार पॉईंटकडे जाणार्या लेनवरील वाहतूक बंद

पर्यायी मार्ग

- उपनगरकडून रेल्वेस्टेशनकडे जाणारी वाहतूक दत्त मंदिर सिग्नलच्या उजवीकडून सुराणा हॉस्पिटल, आनंदनगरी टी पॉईट - सत्कार पॉईंट - रिपोर्टे कॉर्नर येथून रेल्वे स्टेशनकडे- परत सुभाष रोड मार्गे - दत्त मंदिरा सिग्नल इतरत्र

- रेल्वे स्टेशनकडून सीबीएसकडे जाणारी वाहने जुने नाशिकरोड कोर्टसमोरून आर्टिलरी रोड मार्गे जयभवानी चौकातून उजवीकडे वळून उपनगर सिग्नलकडून इतरत्र

- पुणेकडून नाशिककडे येणारी-जाणारी अवजड वाहने, बसेस दत्त मंदिर सिग्नल येथून वीर सावरकर उड्डाणपुलावरून मार्गस्थ

- विहितगाव सिग्नलकडून बिटकोकडे जाणारी वाहतूक देवळाली गाव, मालधक्का रोडने रेल्वेस्टेशनकडे

Ram Navami Miravnuk Nashik Road police
Nashik Ram Navami 2024 : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क! पोलीस आयुक्तांकडून कडेकोट बंदोबस्ताच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com