Nashik Ram Navami 2024: रामनवमीनिमित्ताने शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त! शुक्रवारी रामरथ मिरवणूक; वाहतूक मार्गातही बदल

Nashik News : श्री प्रभुरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकमध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
Ramrath Miravnuk police
Ramrath Miravnuk policeesakal
Updated on

Nashik Ram Navami 2024 : श्री प्रभुरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकमध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्या पार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनखाली शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. बुधवारी (ता. १७) रामनवमी असल्याने पंचवटीतील काळाराम मंदिरात भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता असते. तसेच, गर्दीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आलेले आहे. (Nashik Ram Navami 2024 Strict police presence in city news)

रामनवमीनिमित्ताने शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटीमध्ये परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह सहाय्यक आयुक्त नितीन जाधव, डॉ. सिदधेश्वर धुमाळ, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण चव्हाण यांच्यासह सुमारे 200 पोलीस कर्मचारी, 60 स्त्री-पुरुष होमगार्ड, राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात असणार आहे. तसेच, गर्दीमध्ये साध्या वेशातील महिला व पुरुष पोलीस कर्मचारीही सहभागी असणार आहेत.  (latest marathi news)

Ramrath Miravnuk police
UPSC CSE Result 2023: यूपीएससीमध्ये महाराष्ट्रातील किती उमेदवार उत्तीर्ण? कोण आलं प्रथम? जाणून घ्या

वाहतूक मार्गात बदल 

रामनवमीनिमित्ताने काळाराम मंदिरात भाविकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे पंचवटीतील सरदार चौक ते काळाराम मंदिराचा पूर्व दरवाजापर्यंतच्या दोन्ही मार्ग वाहनांसाठी सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत बंद असणार आहे. यामुळे यामार्गावरील वाहनांनी पर्यायी असलेल्या मार्गांचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे. 

रामरथ मिरवणुकीसाठी स्वतंत्र बंदोबस्त

पंटवटीतील परंपरेनुसार, येत्या शुक्रवारी (ता.१९) रामरथ, गरुडरथाची मिरवणूक काढण्यात येत असते. त्यासाठी पोलीस आयुक्त, सहाय्यक आयुक्तांसह ६ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, १० सहाय्यक निरीक्षक, १५० पोलीस, ३५ महिला पोलीस, ६० स्त्री-पुरुष होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या असा बंदोबस्त तैनात असणार आहे.

Ramrath Miravnuk police
Loksabha Diary : Sharad Pawar यांच्या एन्ट्रीने रामदास तडस यांच्या अडचणी वाढणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com