UPSC CSE Result 2023: यूपीएससीमध्ये महाराष्ट्रातील किती उमेदवार उत्तीर्ण? कोण आलं प्रथम? जाणून घ्या

Civil Services IAS Exam: यूपीएससीचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव देशात रँक एक आला आहे
UPSC CSE Result
UPSC CSE Result

नवी दिल्ली- यूपीएससीचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव देशात रँक एक आला आहे. महाराष्ट्रातील ८७ पेक्षा जास्त उमेदवारांचा यादीमध्ये समावेश आहे. पहिल्या १०० जणांच्या यादीमध्ये कुश मोटवानी, अनिकेत हिरडे याचे नाव पहिल्या शंभरांमध्ये आहे. मोटवानीची रँक ११ असून हिरडेची रँक ८१ आहे. (UPSC CSE Result 2023 declared Topper List from maharashtra aniket hirde Civil Services IAS Exam)

यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर उमेदवारांना आपला निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील प्रियांका सुरेश मोहिते हिचा रँक ५९५ आला आहे, तर अर्चित डोंगरे याचा रँक १५३ आहे. यंदा यूपीएससीमध्ये उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या काहीशी घटली आहे. २०२३ मध्ये यूपीएससीच्या ११४३ पदांसाठी जाहीरात निघाली होती. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ९ एप्रिल २०२४ रोजी मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यांनतर आज निकाल जाहीर करण्यात आलाय.

यूपीएससी उत्तीर्ण पूर्ण उमेदवारांची यादी

UPSC CSE Result
UPSC CSE Result 2023 declared : यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर; आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम

उमेदवारांचे मार्क निकालाच्या घोषणेनंतर १५ दिवसांनी जाहीर करण्यात येतील. मुख्य परीक्षेमध्ये २८४६ उमेदवार उत्तीर्ण झाले होते. यातील जवळपास ७० उमेदवार हे महाराष्ट्रातील होते. यूपीएससीच्या परीक्षमध्ये १८० आयएएस, २०० आयपीएस आणि ३७ आयएफएस पदांसाठी भरती निघाली होती. यूपीएससीसाठी लाखो विद्यार्थी अर्ज करत असतात. परीक्षा कठीण असल्याने अनेक जण प्रिलिम परीक्षेमध्येच बाहेर पडतात.

गेल्या दोन वर्षांमध्ये पहिल्या तीनही उमेदवार या महिला होत्या, पण यंदा पहिल्या तीनपैकी दोन मुलं आहे. तिसऱ्या स्थानी महिला उमेदवार आहे. त्यामुळे यंदा मुलांनी बाजी मारली असं म्हणता येईल.(UPSC)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com