
नाशिक : सक्रांत काळात घराबाहेर पडण्याची भीती नाशिककरांच्या मनात दाटून येते. कधी नायलॉन मांजाने गळा चिरला जाईल, घराबाहेर पडलेला माणूस सहीसलामत घरी परत येईल, याची काही शाश्वती नाही. अशा जिवावर बेतणाऱ्या नायलॉन मांजावर बंदी असतानाही नाशिककरांच्या गळ्याभोवती दिवसेंदिवस नायलॉन मांजाचा फास अधिक आवळला जात आहे. पतंगोत्सव आणि नाशिक हे एक वेगळेच समीकरण आहे.