नामपूर- दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्चून दळणवळणाच्या सुविधांसाठी दर्जेदार रस्त्यांची निर्मिती केली जाते. तरीही गेल्या तीन वर्षांत राज्यात एक लाखापेक्षा जास्त अपघात झाल्याची धक्कादायक माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उजेडात आली असून, या अपघातांमध्ये ४५ हजार ८९५ निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांत सर्वाधिक १६ ते ४० या वयोगटातील तरुणांचा समावेश असून, अपघातातील मृत्यूमध्ये तरुणांचे प्रमाण ६६ टक्के आहे.