Nashik fake tribal officer job scam case
esakal
नाशिक : महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक करण्यात आलेला रवींद्र एरंडे याचा आणखी एक धक्कादायक चेहरा समोर आला आहे. एरंडेने बेरोजगारांना (Ravindra Erande Scam) आदिवासी विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, त्याने स्वतःची खरी ओळख लपवून 'राजेंद्र दयाराम सबनीस' या नावाने वावरत आदिवासी विभागातील अधिकारी असल्याचे भासविले.