Nashik NMC : वैद्यकीय, अग्निशमन रिक्तपदांची भरती संकटात! ‘टीसीएस’ला ‘ड’ वर्ग पदे भरण्याचा अधिकार

Nashik News : महापालिकांची रिक्तपदे तसेच नव्याने भरती केली जाणारी पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्याची घोषणा करण्यात आल्याने महापालिकेच्या ६२४ पदांची नोकर भरती संकटात आली आहे.
NMC Nashik
NMC Nashik Newsesakal

Nashik News : पेपरफुटी प्रकरणाच्या अनुषंगाने राज्यात अ, ब व क वर्ग महापालिकांची रिक्तपदे तसेच नव्याने भरती केली जाणारी पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्याची घोषणा करण्यात आल्याने महापालिकेच्या ६२४ पदांची नोकर भरती संकटात आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीला फक्त ‘ड’ वर्ग महापालिकांची पदे भरण्याचा अधिकार राहणार आहे. (recruitment of 624 posts of Municipal Corporation has become crisis)

१९९२ ला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यानंतर नाशिक महापालिकेला सुधारित आकृतिबंधानुसार ७ हजार ९२ पदे मंजूर करण्यात आले. त्या वेळी महापालिकेला ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला. ७ हजार ९२ पदांपैकी जवळपास २८०० पदे रिक्त झाली आहे. यातील वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ७०६ पदे अत्यावश्यक बाब म्हणून कोविडकाळात भरण्यास शासनाने मंजुरी दिली होती.

मात्र रिक्त पदांची भरती करताना आयबीपीएस किंवा टीसीएस या दोन कंपन्यांची नियुक्ती शासनानेच करून दिली होती. या दोनपैकी एका कंपनीमार्फत रिक्त पदांची भरती करण्याच्या सूचना होत्या. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेकडून टीसीएस अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीची नियुक्ती केली.

‘अ’ वर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती केली जातात. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळून ६२४ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तांत्रिक अडचणी व लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे अद्यापपर्यंत भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. मात्र आता रिक्त पदांची भरती अडचणीत सापडली आहे. (latest marathi news)

NMC Nashik
Nashik Teacher Constituency : विधान परिषदेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा! सलग 26 तासांच्या मतमोजणीनंतर किशोर दराडे विजयी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वर्गातील नोकरभरतीदेखील राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्याचे निर्देश दिल्याने आता सर्वच पदांसाठी स्पर्धा परीक्षाप्रमाणे अभ्यास करावा लागणार आहे.

अत्यावश्यक पदे सोडून इतर पदे भरतानादेखील तांत्रिक अडचण आहे. शासनाच्या नियमानुसार आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या पुढे असेल तर पदे भरता येत नाही. नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च हा ४९ टक्क्यांच्या वर पोचला आहे. त्यामुळे ती भरतीदेखील करता येणार नाही.

"नाशिक महापालिकेचा वर्ग असताना त्या वेळी मंजूर करण्यात आलेल्या पदांपैकी महत्त्वाच्या अग्निशामक व वैद्यकीय विभागातील पदांची भरती करण्यासाठी टीसीएस कंपनीमार्फत प्रक्रिया झाली होती. परंतु आता शासनाकडून नवीन सूचना आल्यास त्यानुसार रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविली जाईल." - डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

NMC Nashik
Nashik Malnutrition Relief : कुपोषणमुक्तीसाठी प्रत्येक तालुक्यात आता किलबिल मेळावे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com