
नामपूर : गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक दिलासा दिल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. आपद्ग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात सरकारी मदत जमा करण्यात आल्याने बँकांकडून होणाऱ्या अडवणुकीला लगाम लागला आहे. राज्यातील पाच लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९३ रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून, उत्तर महाराष्ट्राला सुमारे १३ कोटींहून अधिक रुपयांची मदत मिळाली आहे.