

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजवंदन केलं. यावेळी मंत्री महाजन यांनी केलेल्या भाषणावरून वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याने गोंधळ घातल्याची घटना घडलीय. मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणावर वन कर्मचाऱ्यानं आक्षेप घेत जाब विचारला. मंत्री महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असा प्रश्न वन कर्मचाऱ्याने उपस्थित केला.