Revenue Target
sakal
नाशिक: राज्य शासनाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यासाठी ४७७ कोटी ७५ लाख ६८ हजार रुपयांचे महसूल उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यात जमीन महसूलचे २२७ कोटी ७५ लाख ६८ हजार, तसेच गौण खनिजच्या २५० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले. गेल्या वर्षाशी तुलना केल्यास जिल्ह्याच्या उद्दिष्टात यंदा १७५ टक्क्यांची वाढ झाली आहे.