नाशिक रोड- ‘उबेर, ओला’ सेवेविरोधात येथील बस व रेल्वेस्थानकातील रिक्षाचालक- मालक संघटनेने एल्गार पुकारला आहे. व्यवसाय ठप्प झालेले असून ओला, उबेर रिक्षाचालकांमुळे आमचा रोजगार निम्म्याहून कमी झाला आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आली असल्याने आंदोलन करून ‘ओला, उबेर’ रिक्षाचालकांना नाशिक रोडमध्ये फिरू देणार नाही, अशी प्रतिक्रिया येथील रिक्षामालकांनी नोंदवली आहे.