Street Food Hub : नाशिक रोडला पहिला ‘स्ट्रीट फूड हब’! केंद्र सरकारकडून प्राप्त होणार अनुदान

Nashik News : देशभरात शंभर फूड स्ट्रीट उभारण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. यामध्ये नाशिकचा शंभर शहरांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
Street Food Hub
Street Food Hubesakal

Nashik News : शहरांमध्ये खवय्यांची संख्या वाढत असताना खवय्यांना स्वच्छ व सुरक्षित अन्न पुरवण्याची जबाबदारीदेखील सरकारची आहे. त्याअनुषंगाने देशभरात शंभर फूड स्ट्रीट उभारण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. यामध्ये नाशिकचा शंभर शहरांमध्ये समावेश करण्यात आला आहे. (Nashik Road first Street Food Hub)

त्याअनुषंगाने राज्याच्या अन्य व औषध प्रशासनाला महापालिकेने नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिराच्या बाजूला पहिला ‘स्ट्रीट फूड हब’ उभारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात खवय्यांची संख्या वाढत आहे. खवय्यांच्या मागणीनुसार शहरात जागोजागी जंक फूड, नाष्टा, चायनीज कॉर्नरची दुकाने थाटली गेली आहे.

परंतु प्रत्येक ठिकाणी दर्जेदार अन्न मिळेल, याची खात्री नाही. यातून मोठ्या प्रमाणात आजार उद्भवतात. त्यामुळे स्वच्छ सुरक्षित व दर्जेदार अन्न खाद्यपदार्थाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने देशभरात शंभर फूड स्ट्रीट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या फूड स्ट्रीटमध्ये शहरातील पर्यटन, धार्मिकस्थळी व ज्या ठिकाणी नागरिकांचे गर्दी होते. (latest marathi news)

Street Food Hub
Nashik Police Written Test: पोलिस भरतीच्या ‘लेखी’ परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात! शहराची KTHM तर, ग्रामीणची भुजबळ नॉलेज सिटीत

त्या ठिकाणी फूड उभारले जाणार आहेत. हबमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, प्रसाधनगृह, वाहनतळ, विद्युत रोषणाई, कचरा व्यवस्थापन अनिवार्य राहणार आहे. केंद्र सरकारकडून ६०, राज्य सरकार ४० टक्के खर्चाचा वाटा उचलणार आहे. अनुदान स्वरूपात १ कोटी रुपये प्राप्त होणार आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार फूड स्ट्रीट हबमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पहिल्या चार शहरात नाशिकला मान

फूड स्ट्रीट हबमध्ये देशातील शंभर पैकी महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुणे, नागपूर व ठाणेसह नाशिकचा समावेश करण्यात आला आहे. फूड हबसाठी केंद्र सरकार महापालिकेला एक कोटीचे अनुदान ते नाशिकमध्ये नाशिक रोड भागातील मुक्तिधाम मंदिराच्या परिसरात पहिला साकारण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला सादर केला आहे.

Street Food Hub
Nashik ZP News : जि. प. कर्मचारी बँकेची रविवारी वार्षिक सभा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com