नाशिक रोड/ उपनगर- आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन इच्छुक सध्या मिसळ पार्टी आणि वाढदिवसाच्या महोत्सवातून शक्तीप्रदर्शन करताना दिसून येत आहेत. नाशिक रोडला तिघा इच्छुकांनी एकाच दिवशी शक्तीप्रदर्शन केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आतापासूनच जोरदार तयारी सुरू झाली आहे. लोक एकत्रित जमविण्यासाठी काहीतरी निमित्त काढून वाढदिवस व मिसळ पार्टीचे आयोजन ठिकठिकाणी होत आहे.