Nashik Bribe Crime: नाशिक रोडचे पोलीस निरीक्षक गणपत काकड रंगेहात ACBच्या जाळ्यात

Ganpat Kakad arrested
Ganpat Kakad arrestedesakal

Nashik Bribe Crime : नाशिक रोडचे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक गणपत महादू काकड यांना 15000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

त्यामुळे नाशिक रोड पोलीस स्टेशन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Nashik Road Police Inspector Ganpat Kakad red handed arrested in ACB net Bribe Crime)

नासिक रोड पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदाराला 354 च्या गुन्ह्यात मदत करणार या आश्वासनावर 25 हजाराची लाच काकड यांनी मागितली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.

25 हजाराहून हे डील 15 हजारावर ठरवण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नासिक रोड पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस गणपत काकड यांना पंचांसमक्ष पंधरा हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ganpat Kakad arrested
Nashik Bribe Crime: सातबाऱ्यावर नावनोंदणीसाठी मागितली 2 हजारांची लाच; त्र्यंबकच्या तलाठी, कोतवालास रंगेहाथ अटक

यासंदर्भात गणपत काकड यांच्यावर गुन्ह्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे. दरम्यान गणपत काकड हे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांचे अतिशय निकटवर्तीय सहकारी मानले जात होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे नाशिक रोड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. शिवाय नाशिक रोड पोलीस छुप्या पद्धतीने चालणाऱ्या अवैध धंद्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे.

Ganpat Kakad arrested
Solapur Crime : तुला जिवंत सोडणार नाही म्हणत 16 जणांचा तरुणावर हल्ला; लाकूड, लाथाबुक्क्यांनी मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com