Nashik : रेल्वेला भीषण आग; अग्निशमन दलाचे बंब दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Railway on fire
Nashik : रेल्वेला भीषण आग; अग्निशमन दलाचे बंब दाखल

Nashik : रेल्वेला भीषण आग; अग्निशमन दलाचे बंब दाखल

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडीच्या एका बोगीला आग लागली. स्टेशनवर रेल्वे थांबली असताना ही घटना घडली आहे. यानंतर प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आलं आहे. सध्या आग नियंत्रणात आली आहे.

हावडा मुंबई शालिमार एक्सप्रेस मधील कपड्याच्या बोगीला आग लागली आहे. आगीमुळे स्थानकावर धुराचे लोट पाहण्यास मिळत आहे. या घटनेमुळे स्टेशन परिसरात गोंधळ उडाला आहे. नाशिक अग्निशमन दलाचे बंब रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर हावडा बोगीला एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकात पोहचताच आग लागली.

या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. आग लागताच तात्काळ प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं होतं. कपड्यांच्या बोगीला ही आग लागली आहे.

गोदावरी शिर्डी एक्सप्रेस पाटलीपुत्र एक्सप्रेस गोदान एक्सप्रेस पनवेल एक्सप्रेस शताब्दी आणि त्यानंतर पॅसेंजर या गाड्या लेट होणार आहेत. या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार हूनही जाऊ शकतात. अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून मिळते आहे.

टॅग्स :NashikFire Accident