उपनगर: नाशिक रोड रेल्वेस्थानकाचे रूप लवकरच पालटणार आहे. ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानक आता नव्या रूपात सिंहस्थाच्या निमित्ताने प्रवासी, लोकांना दर्शन घडणार आहे. ४९.३३ कोटी रुपये खर्चून या रेल्वेस्थानकाची उभारणी होणार असून, इंजिनिअरिंग कामासाठी ४० कोटी, इलेक्ट्रिक कामासाठी तब्बल सात कोटी ४९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. बारा महिन्यांत हे काम पूर्ण करावयाचे असल्यामुळे या संदर्भात अधिकाऱ्यांची पाहणी झाली.