.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षांदरम्यान पुन्हा बुधवारी (ता. ४) पेपरफुटीची अफवा पसरली होती. मात्र असा कुठलाही प्रकार घडलेला नसल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दिले आहे. अशा स्वरूपाच्या अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या तयारीत विद्यापीठ प्रशासन असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी (ता. ३) वैद्यकीय विद्याशाखेच्या लेखी परीक्षेदरम्यान दुपार सत्रात द्वितीय वर्ष एमबीबीएसच्या फार्माकोलॉज-१ विषयाचा पेपर फुटल्याची माहिती विद्यापीठाला ई-मेलवर मिळाली होती.