
नाशिक : नाशिकच्या धावपटूंनी पदकांची केली लयलूट
नाशिक : बंगळुरू (Bangalore) येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये नाशिकच्या (Nashik) धावपटूंनी पदकांची लयलूट केली आहे. नाशिकला सराव करणाऱ्या कोमल जगदाळे हिने सुवर्णपदकाला (Gold medal) गवसणी घातली. अजय राठीने रौप्य आणि पूनम सोनोने ही धावपटू कांस्यपदकाची (Bronze medal) मानकरी ठरली आहे. (Nashik runners won medals)
तिन्ही खेळाडू भोसला सैनिकी महाविद्यालय केंद्रातील खेळाडू असून, ते एकलव्य अकॅडमीअंतर्गत सराव करतात. या स्पर्धेत सहभागी होताना कोमलने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहभागी होताना ३ हजार मीटर स्टिपलचेस या गटातून सूवर्णपदक पटकावले. १० मिनिटे १३.४९ सेकंद अशी वेळ नोंदवितांना तिने ही कामगिरी केली आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची रेबी पाल ही द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली. या गटातून युनिव्हर्सिटी ऑफ लखनौची काजल शर्मा हिने कांस्यपदक (Bronze medal) पटकावले.
हेही वाचा: Women's Cricket : लक्ष्मणच्या खांद्यावर पडणार मोठी जबाबदारी; रमेश पोवारचं काय?
नाशिकला (nashik) सराव करणाऱ्या अजय राठीने लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीकडून सहभागी होताना पाच हजार मीटर पुरुषांच्या गटातून रौप्यपदक (Silver medal) पटकावले. या गटातून महर्षी दयानंद युनिव्हर्सिटीच्या लोकेश चौधरीने अव्वल क्रमांकासह सूवर्णपदक (Gold medal) पटकावले. दरम्यान नाशिकच्या पूनम सोनोने हिने पाच हजार मीटर महिलांच्या गटातून धावतांना कांस्यपदकाची (Bronze medal) कमाई केली. ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे स्पर्धेत सहभागी झाली होती. या गटातून निकिता राउत हिने सुवर्णपदक (Gold medal) तर भारतीने रौप्यपदक (Silver medal) पटकावले. या खेळाडूंना प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा: Womens Cricket : 'BCCI'च्या शिबिरासाठी ईश्वरी सावकारची निवड
Web Title: Nashik Runner Wins Gold Medal In Khelo India University Games In Bangalore Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..