SAKAL Meet Up : भक्तिभावाने कलेची वारी करणारे कलावंत! मिसळ क्लब सदस्यांचा सकाळ मीट-अपमध्ये संवाद

Nashik News : रविवारी (ता. ७) मिसळ क्लबच्या सदस्यांनी सातपूर येथील सकाळ मीट-अप कार्यक्रमात ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांच्याशी संवाद साधला.
Members of Misal Club participating in Sakal meet-up program at 'Sakaal' Satpur office.
Members of Misal Club participating in Sakal meet-up program at 'Sakaal' Satpur office.esakal

नाशिक : आठवड्याचे सहा दिवस आपापली नोकरी, व्यवसाय सांभाळायचा आणि शेवटचा दिवस रविवार मात्र स्वतःसाठी जगायचा. इथे कलेची आवड असणारे कलावंत जेहान सर्कल, एबीबी सर्कलजवळ एकत्र जमतात. एक ठिकाण निवडतात, सोबत चित्रकलेचे सर्व साहित्य बाळगतात.

सकाळी मिसळचा आस्वाद घेतात आणि दिवसभर पेंटिंग, फोटोग्राफी करतात. इथे ना वयाची अट, ना कुणाशी स्पर्धा, सर्व एकसमान... कलेचा धागा जोडला गेल्याने २० वर्षांत ही वीण कधी उसवली नाही. मिसळच्या परिपूर्ण डिशप्रमाणे मिसळ क्लबच्या सदस्यांची जमलेली ही सरमिसळ बघून अनेकांनी प्रेरणा घेतली आहे. (Nashik SAKAL Meet Up Misal Club members interaction news)

रविवारी (ता. ७) मिसळ क्लबच्या सदस्यांनी सातपूर येथील सकाळ मीट-अप कार्यक्रमात ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांच्याशी संवाद साधला. नाशिक मिसळ क्लब अशी संस्था आहे. जिथे दर रविवारी कलेची वारी हे कलावंत करतात.

विविध वयोगट, भिन्न विचारसरणी आणि वेगवेगळ्या व्यावसायिक शिक्षण कार्यक्षेत्रातून आलेल्या लोकांचा समूह एकत्र येतो, म्हणून मिसळ क्लब असे नाव. सर्वांची आवड एकच, ती म्हणजे कला. रविवारी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन चित्रे, छायाचित्रे आणि ज्याला जे-जे आवडेल ते माध्यम निवडून निसर्गाचा आनंद घ्यायचा.

वास्तविक, पॅरिसमधील मोमार्तमध्ये दर रविवारी कलाकार मंडळी एका टेकडीवर जमतात आणि चित्रे काढतात. हे सारे नाशिकमध्ये घडत असल्याचे चित्रकार लेखक सुभाष अवचट यांना कळल्यावर त्यांनी मिसळ क्लबवर लेखच लिहिला. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत असे ग्रुप तयार होऊ लागले.

ही खरी कलेची सेवा. पंढरपूरच्या वारीसारखे भक्तिभावाने कलेची वारी करणारे मिसळ क्लबचे कलावंत. या कलावंताच्या चित्र आणि फोटोग्राफीचे प्रदर्शन येत्या १२, १३ व १४ एप्रिल रोजीला कुसुमाग्रज स्मारकाच्या छंदोमयी सभागृहात करण्यात आले आहे.

-शहराच्या शुभोभीकरणासाठी मनपात कला विभाग असावा

-कलाकार संपल्यावर कला संपते ,त्या कलाचित्रांचे जतन करण्यात यावे

-चित्रकारांना प्रदर्शनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे

-जेणेकरून बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना शहरातील चित्रसंग्रह बघता येईल

-जितकी पेंटिंग जुनी तेवढा अधिक परतावा देणारा व्यवसाय

-केवळ अनुदान महत्त्वाचे नसून कला टिकविणे महत्त्वाचे

-पूर्णवेळ चित्रकलेत करिअर करायचे असल्यास केवळ पाच टक्के पर्याय उपलब्ध

 (latest marathi news)

Members of Misal Club participating in Sakal meet-up program at 'Sakaal' Satpur office.
Rangoli Business : रांगोळीमुळे वाढतेय कार्यक्रमाची शोभा! 'संस्कृती' संवर्धनासह कलाकारांना मिळतोय रोजगार

चित्र खरेदी-विक्रीचे माध्यमच नाही

शहराचा विकास होतो तसा शहरातील जुना परिसर कालांतराने नाहीसा होत जातो. वर्षभरापूर्वी चित्रात काढलेला परिसर भविष्यात बघायला मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी ही चित्र आठवण म्हणून कायम सोबत राहतात. शिवाय नाशिक शहराला वॉटर पेंटिंगची मोठी ओळख आहे.

चित्रकार चित्रांची निर्मिती करतो; पण कलावंत संपला की कला संपते. त्याच्या मुलांना चित्रांविषयी आस्था असेलच असे नाही. अशावेळी त्या चित्रांचे जतन करण्याची समस्या उरते. त्याचबरोबर चित्र खरेदी-विक्री करण्याचे कोणतेही माध्यम नसल्याने कलावंत निर्मिती करतो; पण मार्केटिंगअभावी चित्रकला उपेक्षित राहून जाते.

घरात पेंटिंग लावण्याची पद्धत नाही

अमेरिकेत घराची सजावट करताना हमखास पेंटिंग विकत घेऊन लावली जातात. आपल्याकडे घर सजविण्यासाठी फर्निचर, कलरिंग, इंटेरियरवर मोठा खर्च करतील; पण पेंटिंग विकत घेऊन घरात लावण्याची पद्धतच नसल्याने पेंटिंगची विक्री होत नाही. वास्तविक, कलाकार जसा मोठा होत जातो तशी त्याच्या चित्रांचे मूल्य वाढत जाते.

मिसळ क्लबचे उपस्थित सदस्य

धनंजय गोवर्धने, अशोक ढिवरे, सी. एल. कुलकर्णी, अवी जाधव, संध्या केळकर, श्रीकांत नागरे, सचिन पाटील, नितीन बिल्दीकर, मनोज जोशी, सुधाकर सोनवणे, दीपक देवरे, अतुल भालेराव, सुनील महामुनी, योगेश जोशी, महेश दीक्षित, दीपाली नागरे, रामभाऊ डोंगरे, हर्शल आहिरराव, वैशाली अभ्यंकर, सतीश पवार, शिवाजी काकड, किरण पाटील

Members of Misal Club participating in Sakal meet-up program at 'Sakaal' Satpur office.
Gurumauli Annasaheb More : श्री स्वामींचे स्मरण हा प्रपंचातला निव्वळ नफा! गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com