SAKAL Special : चालता- बोलता! हंड्रेड

SAKAL Special : शिक्षकांना फार हुशार समजले जाते. त्यामुळेच समाजात त्यांना मानाचे स्थान असते. पण हल्ली शिक्षणच फार बदलत चालले आहे.
teacher and student
teacher and studentesakal

हंड्रेड

शिक्षकांना फार हुशार समजले जाते. त्यामुळेच समाजात त्यांना मानाचे स्थान असते. पण हल्ली शिक्षणच फार बदलत चालले आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या शिक्षकांना आता सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमाचे वर्ग घ्यायला भाग पाडले जात आहे. कारण काय, तर शाळेची विद्यार्थीसंख्या टिकली पाहिजे.

एका शाळेतील मराठी विषयाच्या ज्येष्ठ शिक्षिकेवर दुसरा विषय शिकवण्याची जबाबदारी पडते. आता नाही तर म्हणू शकत नाही. मग काय करायचे म्हणून त्यांनी अजब शक्कल लढवली. विद्यार्थ्यांसमोर बोलताना नियमित वापरात येणारे शब्द त्यांनी थेट हातावरच लिहून आणले. तेच शब्द बोलायचे आणि वेळ मारून न्यायची अशी त्यांची ‘आयडिया’ काही दिवस चालली.

पण एक दिवस तर हद्दच झाली. मॅडमने थेट ‘हंड्रेड’चे स्पेलिंगच हातावर लिहून आणले. मुख्याध्यापकांसमोर हातवारे करून बोलताना ही बाब उघडकीस आली. तेव्हापासून बाईंची बोलती बंद झाली आहे, आता बोला..!

( nashik SAKAL Special chalta bolta Hundred marathi news )

...अन् कार्यक्रमापूर्वी पाहुणे निघून गेले

महाकवी कालिदास कलामंदिरात एका संस्थेतर्फे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात कला, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान विशेष निमंत्रितांपैकी एका प्रमुख पाहुण्यांचा अभिवाचनाचा कार्यक्रमदेखील ठेवण्यात आला होता.

मात्र अभिवाचन सुरू असतानाच प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले आणि कार्यक्रमास उशीरही होतोय यामुळे ऐन अभिवाचनदरम्यान आयोजकांकडून पडदा टाकण्यात आला. या कृतीतून आयोजकांनी आपल्यासह आपल्या संघाचा अपमान केला, याचा राग विशेष निमंत्रित असलेल्या मान्यवरांना आला.

यानंतर आयोजकांसमोर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत कार्यक्रम पूर्ण होण्याच्या आतच काढता पाय घेतला. आपण जर निमंत्रित केले आहे तर त्यांचा आदरही करायला हवा, अशी चर्चा या प्रसंगामुळे उपस्थितांमध्ये रंगली होती.

teacher and student
SAKAL Special : चालता- बोलता! निवडणुका लावा हो

...अन्‌ हा भाग आमच्या हद्दीत

वासननगर भागातील एका माजी मुख्याध्यापकांच्या घरातील वीज गेली. आधीच उन्हाळ्याचे दिवस, त्यात भयंकर उकाडा, त्यामुळे सर्व कुटुंब हैराण. त्यांनी मग वीज कंपनीच्या कार्यालयात तक्रार केली. जवळच असणाऱ्या राणेनगर भागातील कर्मचारीही आले. मात्र त्यांनी सांगितले, की हा परिसर आमच्या हद्दीत येत नाही. पाथर्डीला संपर्क साधा.

त्यांनी पाथर्डीला तक्रार केली आणि ठिकाण सांगितले. पाथर्डीवालेही म्हणाले, की हा भाग आमच्या हद्दीत येत नाही. हे ऐकल्यावर सरदेखील मग तडकले आणि म्हणाले, की तुमच्या दोघांच्या हद्दीत हा भाग येत नाही, मग एक काम करा, ती विजेची पेटी उचला आणि माझ्या घरात आणून ठेवा.

त्यावर समोरील व्यक्तीने मग तुमच्या वीजबिलावरचा इंडेक्स नंबर सांगा, असे सांगितले. तो सांगितल्यानंतर मग त्यांनी सांगितले, अरे, हो तुमचा भाग आमच्या हद्दीतच येतो. कुणाला तरी पाठवतो. अर्थात, दुपारी झालेल्या या संवादानंतर सायंकाळपर्यंत कुणीही दुरुस्तीसाठी आले नव्हते, ही बाब वेगळी!

teacher and student
SAKAL Special : चालता- बोलता! अस्वस्थ होऊ नका, मीही तुमच्यातलाच

खिशाला झळ बसतेय...

नाशिक जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत कमी होणारी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून जिल्हा स्वीप समितीतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या समितीच्या नोडल अधिकारी पदाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासकांवर सोपविण्यात आली आहे.

त्यामुळे प्रशासकांकडून मतदान टक्केवारीसाठी जोरदार जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही जबाबदारी देण्यात आली आहे. शासकीय आदेश असल्याने अधिकारी व कर्मचारी हे काम करत आहे. झाले असे की, जनजागृतीसाठी अधिकारी व कर्मचारी यांना विविध कार्यक्रमासाठी काही खर्च करावा लागत आहे.

निवडणूक शाखेकडून मात्र निधी मिळत नाही. हा निधी खिशातून द्यावा लागत आहे. यावर शाखेकडून खर्च मिळणार का, अशी विचारणा एका कर्मचाऱ्याने केली. मात्र, निवडणूक आयोगाकडून या कामासाठी तोकडा निधी नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर संबंधित कर्मचाऱ्याने म्हणजे काय कामाची झळ आमच्याच खिशाला बसणार, अशी पुटपुट केली अन् निमूटपणे निघून गेला...

teacher and student
SAKAL Special : चालता-बोलता! घोळ मिटवा...उमेदवार ठरवा

समजूत काढता काढता लागतोय दम

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने नाशिक लोकसभेची उमेदवारी जाहीर करत आघाडी घेतली. मात्र महायुतीचा उमेदवार अद्यापही अंतिम झालेला नाही. यातच, दररोज नवनवीन उमेदवारांची नावे चर्चेला येत आहेत.

त्यामुळे महायुतीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांची घालमेलदेखील वाढली आहे. यातच दोन कार्यकर्ते एकमेकांशी संवाद साधत चर्चा करत होते. ‘साहेबांच्या तिकिटाचे फायनल झाले आहे. मात्र घोषणा का झाली नाही, याबाबत माहिती नाही’. त्यावर दुसऱ्या कार्यकर्त्याने लागलीच, ‘तिकीट फायनल आहे, तर नवनवीन उमेदवारांची नावे का पुढे येत आहे?’ अशी विचारणा केली.

नाशिक उमेदवारीवरून हॉट झालेले आहे. त्यामुळेच कदाचित घोषणा होण्यास विलंब होत असेल, असे कार्यकर्त्याने सांगण्याचा प्रयत्न केला. अरे, हे झाले खरं. यात लोकांची समजूत काढता काढता दम लागू राहिला त्याचे काय करायचे,’ असा प्रश्न कार्यकर्त्याने उपस्थित केला.

teacher and student
SAKAL Special : चालता-बोलता! आता हजेरीवर जीएसटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com