SAKAL Special : चालता-बोलता! आता हजेरीवर जीएसटी

SAKAL Special : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी कार्यकर्त्यांची जमा जमा सुरू आहे. अशाच एका ठिकाणी कार्यकर्त्यांची जमा जमव सुरू असताना एकाने जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला.
GST
GSTesakal

आता हजेरीवर जीएसटी

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी कार्यकर्त्यांची जमा जमा सुरू आहे. अशाच एका ठिकाणी कार्यकर्त्यांची जमा जमव सुरू असताना एकाने जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला.

केंद्र सरकारकडून जर प्रत्येक गोष्टीवर कर स्वरूपात जीएसटी लावला जात असेल तर आता आम्हाला देखील प्रचारासाठी बोलावताना जीएसटी का नको0 असे म्हणत एकाने प्रचाराला उपस्थित राहण्यासाठी तासनिहाय भाडे आकारून त्यावर मनोरंजनाचा १८ तक्के जीएसटी देखील लावून इच्छुक उमेदवाराच्या पदाधिकाऱ्यांची भंबेरी उडवून दिली.

(nashik SAKAL Special chalta bolta Now GST on attendance marathi news)

३१ मार्च संपला आहे आता

‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’चा अनुभव सामान्यांना येतो. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळात टेबलावर बसून किती अन् काय काम करतात, हा तसा संशोधनाचा विषय आहे. जिल्हा नियोजन समितीकडून विकासकामांसाठी प्राप्त झालेला निधी खर्चासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत होती.

निधी वेळेत प्राप्त होऊनही तो वेळेत खर्च होत नाही. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून निधी खर्चासाठी धावपळ सुरू होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने निधी खर्चासाठी अवधी न मिळाल्याने जिल्हा परिषदेने शासकीय सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवत काम केले.

याकाळात कर्मचाऱ्यांकडून ३१ मार्चची कामे आहेत, ही सबब पुढे करत सामान्यांची कामे केली जात नव्हती. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत एका विभागात ग्रामीण भागातील लोक कामासाठी दाखल झाले. त्यावेळी कर्मचाऱ्यांकडून त्यांना पुन्हा ३१ मार्चची कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मात्र, ही बाब संबंधित विभागप्रमुखांच्या लक्षात आली असता त्यांनी कसला ३१ मार्च तो संपला आहे, आता त्याचे काम मार्गी लावा, असा फतवा काढला. त्या कर्मचाऱ्यांनी निमूटपणे त्या लोकांचे काम हाती घेतले. (latest marathi news)

GST
SAKAL Special : चालता- बोलता! विजय आपलाच, तरी नाराज

साहेब, आज इकडे कसे काय?

निवडणूक लागली, की नेत्यांना कार्यकर्त्यांची आठवण होते. पाच वर्षांत ज्यांच्या घरी कधी जाणे झाले नाही, त्यांच्या घरापर्यंत चालत जातात. जिल्ह्याचे असेच एक दमदार नेतृत्व सिन्नरला एका कार्यकर्त्याच्या घरी पोचले. घरीच असलेला कार्यकर्ता साहेबांना पाणी देतो. ‘साहेब, आज इकडे कसे काय’ म्हणून विचारू लागतो.

तर साहेब म्हणतात, ‘काहीनाही, इकडून निघालो होतो, म्हटले तुला भेटून जावे’. साहेबांचा आवाज आणि बोलण्याच्या लकब बघून कार्यकर्त्याला कळले, की निवडणुकीमुळे साहेबांचे पाय आपल्या घराला लागले. त्याने ताडकन प्रत्युत्तर दिले, ‘साहेब, माझे आई-वडील गेले तेव्हा तुम्ही साधे दारावरही पोचले नाही.

आता निवडणुका लागल्या तर लगेच आमची आठवण झाली. पण, यंदा तुमचे काम करणे काही जमणार नाही’, असे थेट सांगूनच टाकले. कार्यकर्ता नाराज झाल्याचे बघून साहेब जागेवरून उठले आणि दुसऱ्या घराकडे निघाले...

GST
SAKAL Special : चालता- बोलता! तुम्हीही आचारसंहिता पाळा, घरी येण्याची

गुलाल उधळला पण...

उमेदवार आपल्या गावात आला म्हटल्यावर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचतो. नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असलेला एक उमेदवार सिन्नरच्या दोडी गावात जातो. गावकऱ्यांकडून उत्स्फूर्तपणे जंगी स्वागत करण्यात येते. जेसीबीद्वारे फुले अन्‌ गुलालाची उधळण करून जणू विजयी मिरवणूकच काढली.

विशेष म्हणजे, गावातील दोन्हीही गट या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. एवढे भव्य स्वागत झाल्यानंतर उमेदवारही भारावून गेला. या आनंदाच्या भरात कार्यकर्त्यांनी दुसऱ्या गावातील मित्रांना फोन करून याविषयी माहिती दिली.

आम्ही उमेदवारासाठी काय काय केले, कसे सगळे लोक एकत्र आले याविषयी माहिती तर दिली; पण आम्हाला ‘दादां’नी फार मदत केली आहे. आता त्यांच्या विरोधात काम कसे करायचे म्हणून शंका उपस्थित केली. त्यामुळे हा कार्यकर्ता आता नेमके कोणाचे काम करतो, हे बघावे लागेल.

GST
SAKAL Special : चालता बोलता! अतिउत्साही कार्यकर्ता

नाराज आम्ही, आम्हाला काय कुणाची भीती...

लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला अन् इच्छुकांच्या दिल्लीत जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या. राज्यातील प्रमुख घटक पक्ष युती आणि आघाडीत असल्याने जागावाटपाच्या वाटाघाटीत प्रत्येक पक्षातील इच्छुक नाराजीचा सूर ओढू लागला.

आपल्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या अनेकांचे तिकीट कापले गेले, तर काहींना डावलेले गेले. त्यामुळे नाराज झालेल्या या इच्छुकांनी मात्र अस्वस्थ न होता बंडखोरी किंवा पक्षाला राम राम ठोकत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला.

पक्षात असताना पक्षश्रेष्ठींचा आदेश अंतिम मानणाऱ्या या नाराज इच्छुकांना आता पक्षाबद्दल फारसं प्रेम आणि आत्मियता राहिलेली नाही. स्वबळावर लढण्याचा निर्धार करणाऱ्या या नाराज इच्छुकांना आता कोणी काहीही आदेश दिला तरी यांना कोणाचीही भीती उरलेली नाही.

GST
SAKAL Special : चालता-बोलता! घोळ मिटवा...उमेदवार ठरवा

म्हणून राजाभाऊंची एन्ट्री..!

लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप उमेदवार पूर्णपणे जाहीर नसले, तरी निवडणुकीच्या निमित्ताने अफवांना होत आला आहे. अफवांची गोळी तयार करताना आपल्या विचारांप्रमाणे ते तयार होत असते. महाविकास आघाडीकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

त्या पार्श्वभूमीवर आता विविध चर्चांना उधाण आले आहे. मुळात शिवसेनेतर्फे या जागेवर माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचा दावा होता. ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाल्याने त्या मागची कारणे जो तो आपापल्या परीने चर्चेला आणत आहे.

करंजकर हे आक्रमक वृत्तीचे असल्याने महायुतीकडून नाव चर्चेत आलेले छगन भुजबळ यांना तोडीस तोड देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे भुजबळ यांच्यासमोर शांत वृत्तीच्या वाजे यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेच्याच काही नेत्यांनी प्रयत्न केले. त्यातून करंजकर यांचा पत्ता कट होऊन वाजे यांची एन्ट्री झाल्याचे बोलले जात आहे.

GST
SAKAL Special : चालता... बोलता...! कार्यकर्त्यांशी संवाद महत्त्वाचा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com