SAKAL Special : चालता-बोलता! तुला तिथं येऊन मारीन!

SAKAL Special : मित्रांच्‍या संवादात आपुलकी, जिव्‍हाळा, खोडसाळपणा अशा विविध छटा असतात. पण सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असल्‍याने परस्‍परविरोधी पक्षांना समर्थन देणाऱ्या युवकांच्‍या मैत्रीत जुंपते आहे.
two friends on call
two friends on callesakal

तुला तिथं येऊन मारीन..!

मित्रांच्‍या संवादात आपुलकी, जिव्‍हाळा, खोडसाळपणा अशा विविध छटा असतात. पण सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असल्‍याने परस्‍परविरोधी पक्षांना समर्थन देणाऱ्या युवकांच्‍या मैत्रीत जुंपते आहे. फोनद्वारे झालेल्‍या संभाषणातून याचाच प्रत्यय आला अन्‌ इतरांसाठी हा मनोरंजनाचा विषय ठरला.

झालं असं की, एकाचा फोन वाजला, नंबर सेव्‍ह नसला, तरी समोरून जुना मित्र बोलत असल्‍याने संबंधिताने आवाज क्षणात ओळखला अन्‌ अवघ्या मिनिटाभरात जुन्‍या गप्पांची रंगात आली. समोरून लोकसभा निवडणुकीच्‍या स्‍थानिक वातावरणाची चौकशी झाली. नेमके दोन्‍ही मित्र परस्‍परविरोधी पक्षाचे समर्थक निघाले अन्‌ विनोदी संवादाचे रूपांतर वादविवादात झाले.

हा विवाद इतका विकोपाला गेला, की पहिल्‍या मिनिटात एकमेकांना भेटण्यास उत्‍सुक असलेला मित्र, समोरच्‍या मित्राला म्‍हणाला ‘तुला तिथं येऊन मारीन...’ मात्र या दोघांचा संवाद ऐकत इतरांनी लोटपोट हसण्याचा मनमुराद आनंद लुटला.

( SAKAL Special chalta bolta I will beat you there )

जय-वीरू पुन्हा एक झाले...

ओझर ते पिंपळगाव मतदार बाइक रॅली झाली. यात जय-वीरू पैकी ‘जय’ नावाचा मुखिया ओझरहून बुलेटवर ‘व्होट कर निफाडकरचा’ टी-शर्ट घालून बसला. मागे रामगडचे काही सैनिकही होते. रॅलीचे नानांनी पिंपळगावात पुष्प देऊन स्वागत केले. सर्वजण खाडूनखुडून उपस्थित होते. वीरूकडे मोटारसायकल नाही म्हणून ते थेट चारचाकी घेऊन पिंपळगावात आले.

तेथे जय-वीरूची नजरानजर झाली. जय म्हणे, आत्ता आपण बोललो, तर मनातली मैत्री डोळ्यात येईल. सगळे गेले, की आपण दोघे सोबत जाऊ. जयला येवल्याकडे जायचे होते. त्यात त्यांचा गाडीचा विमा संपल्याचा मोठा मुद्दा डोक्यात ठेवून त्यांनी ती ओझरलाच लावली.

मग कॉलेज गेटजवळ जय, वीरू, सांभा काही वेळ बोलले, नंतर एकाच गाडीत बसले अन् निफाडकडे निघून गेले. वीरू दुसऱ्या जागी कामाला लागल्याने मैत्रीसाठी जयचे खूप पैसे डिझेल टाकण्यात गेले. मैत्रीसाठी एक काहीही हे तत्त्व असताना दोघांमध्ये दुरावा झाला ही वार्ता म्हणजे निव्वळ एप्रिल फुल होता.

कारण आजही अनेकदा जय खिचडी बनवतात तर वीरू आंबट कढी उकळवतात, अशी ही घट्टनाळ कशी काय नाजूक होईल बरं? अखेर एक जण बोललाच फेविकॉल फिका पडेल इतकी मौल्यवान मैत्री जय-वीरूची आहे. सांभा शेजारी उभा असलेला बोलला साहेब आपली लाकडं म्हसणात गेली, तरी ही जोड मरते दमतक तुटायची नाय! (latest marathi news)

two friends on call
SAKAL Special : चालता- बोलता! आचारसंहितेची भोकाडी नको

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com