SAKAL Special : चालता-बोलता! श्रीराम मंदिराचा प्रश्न मिटला, तर आमचा का नाही ?

SAKAL Special : कोणता संदर्भ कुठे दिला जाईल, याचा कोणताही नेम नसतो. घडलेले भलत्या ठिकाणी असते अन त्यांचा दाखला हा दुसऱ्याच ठिकाणी दिला जातो.
Nashik District Bank
Nashik District Bank esakal

श्रीराम मंदिराचा प्रश्न मिटला, तर आमचा का नाही..?

कोणता संदर्भ कुठे दिला जाईल, याचा कोणताही नेम नसतो. घडलेले भलत्या ठिकाणी असते अन त्यांचा दाखला हा दुसऱ्याच ठिकाणी दिला जातो. तर, झाले असे, की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. सुरू असलेल्या संपाची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा बॅंकेत येऊन ठाण मांडले.

त्या वेळी, प्रशासकांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या व बाजू ऐकून घेतली. मात्र, मागण्या सोडविण्याबाबत कायदेशीर अडचण असल्याचे तसेच आचारसंहिता असल्याचे कारण पुढे केले. त्यावर, कर्मचारी संतप्त झाले. अन, आपली बाजू मांडू लागले.

यात एका कर्मचाऱ्याने ३५० वर्षे जुना श्रीराम मंदिराचा प्रश्न मिटविता येऊ शकतो. इतकेच काय, तर ३७० कलमही हटविले जाऊ शकते; तर आमच्या पगारवाढीचा प्रश्न का मिटू शकत नाही, असा सवाल उपस्थित केला. त्या वेळी आंदोलनकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.

(nashik SAKAL Special chalta bolta If problem of Shriram temple is closed why not ours )

Nashik District Bank
SAKAL Special : चालता- बोलता! त्याला शब्दच सुचेना

उद्या गुपचूप शाळेत या

उन्हाचा तडाखा बसत असल्याने सध्या शाळांना सुट्या लागल्या आहेत. फक्त शिक्षकांनाच निकाल बनविण्यासाठी शाळेत बोलावले जाते. त्यातही सकाळ सत्रातच हे काम उरकवले जात असल्याने फार काही ‘वर्कलोड’ नाही. पण, अचानकपणे इलेक्शनची ड्यूटी लागते.

मग आता काय करायचे म्हणून तीन शिक्षक तिकडे आणि उर्वरित शिक्षक शाळेत, असे नियोजन मुख्याध्यापक करतात. हे सगळे झाल्यावर शिपाई त्यांना मी सुटी घेऊ का म्हणून विचारतो. त्याचा प्रश्‍न ऐकून मुख्याध्यापकही अवाक होतात. ‘तू असा प्रश्‍नच कसा विचारला? उद्या गुपचूप शाळेत यायचे’ म्हणून फर्मानच काढतात. (latest marathi news)

Nashik District Bank
SAKAL Special : चालता- बोलता! मतदान झाले की लगेच गिफ्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com