SAKAL Special : चालता- बोलता! मतदान झाले की लगेच गिफ्ट

SAKAL Special : मतदानवाढीसाठी प्रशासन अधिकारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. काही करून मतदानाचा आकडा वाढला पाहिजे, अशा सूचनाच गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना दिल्या जात आहेत.
Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Electionesakal
Updated on

मतदान झाले की लगेच गिफ्ट

मतदानवाढीसाठी प्रशासन अधिकारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. काही करून मतदानाचा आकडा वाढला पाहिजे, अशा सूचनाच गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना दिल्या जात आहेत. मग कुठे शाळेत कार्यक्रम घ्या, मंदिरात, पारावर जमलेल्या लोकांना मतदानाचे आवाहन केले. पण जनजागृती घडविण्यासाठी भाऊंच्या डोक्यात सुपीक आयडिया आली.

मतदान झाले की मतदाराला लगेच गिफ्ट द्यायचे. म्हणजे लोक रांगा लावून मतदान करतील. त्यांना बोलविण्याची गरजच पडणार नाही. ही आयडिया ऐकायला चांगली आहे, पण त्यामुळे आमचीच नोकरी जाईल त्याचे काय? असे अधिकाऱ्याने विचारताच भाऊ खाली बसले.

(SAKAL Special chalta bolta Gift immediately after voting)

कार्यकर्त्यांची होत आहे दमछाक

लोकसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीकडून प्रचार सुरू झाला आहे. यात जाहीर झालेल्या उमेदवारांकडून पहिल्या टप्प्यात गावागावांत जाऊन गाठीभेटी, तसेच चौकसभा घेण्याचे काम सुरू आहे. यासाठी गावात गेल्यानंतर पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सभेसाठी लोकांना गोळा करावे लागत आहे.

यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडली आहे. दोन्ही पक्षांचे दोन गट झाले असून, एक गट महायुतीत तर एक गट महाविकास आघाडीत आहे. गावातील लोकांना या फुटीबद्दल फारसे माहीत नाही. अनेकांना राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची, तर शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची वाटत आहे.

ही माहिती लोकांना नसल्याने स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची सभेसाठी लोक जमविताना मोठी दमछाक होत आहे. त्यांची समजूत काढताना चांगलीच फजिती होत आहे.

Nashik Lok Sabha Election
SAKAL Special : चालता-बोलता; ...अन्‌ वळविली गाडी!

चारशे तरी पडतील का?

लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र जोरात वाहत असताना, नाशिकमध्ये मात्र एका गटाचा उमेदवारच निश्चित झालेला नाही. तरीही त्याच गटातून उमेदवारी करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. उलट दिवसागणिक नवनवीन नावे समोर येत आहेत. यासंदर्भात मात्र सोशल मीडियावर टर उडविणाऱ्यांची कमी नाही.

भाजपने चारशे पारचा नारा दिला आहे अन्‌ याच गटातून निवडणूक लढण्यासाठीचे एकापेक्षा जास्त असलेला प्रत्येक उमेदवार तोच नारा देतो आहे. मात्र कट्ट्यांवरच्या गप्पांमध्ये तर एका उमेदवाराविषयी चर्चा सुरू असताना, एकाने ‘अहो, पक्ष चारशे पार जातो की नाही जात हे सोडा.

पहिले हा गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाय, याला चारशे मतं पडत्यात का ते पाहा आधी. मोठा टिळा लावून, गळ्यात माळा घालून कोणी निवडून येत असतो का, असा टोलाही लगावला. त्यावर कट्ट्यावरचे सगळेच हसले.

Nashik Lok Sabha Election
SAKAL Special : चालता- बोलता! हंड्रेड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.