SAKAL Special : चालता... बोलता...! स्कॉड आले, स्कॉड आले...

SAKAL Special : दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांमुळे सध्या पालक, विद्यार्थी आणि शिक्षकही फार ‘टेन्शन’मध्ये आहेत.
10th student in exam hall
10th student in exam hall esakal

स्कॉड आले, स्कॉड आले...

दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांमुळे सध्या पालक, विद्यार्थी आणि शिक्षकही फार ‘टेन्शन’मध्ये आहेत. शिक्षकांना शाळेचा निकाल शंभर टक्के लावण्याचे टेन्शन तर, विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षेचे आणि पालकांना दोन्हींचे.

त्यामुळे परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त तैनात असतो. अशाच एका शाळेत मंगळवारी पेपरला मुले बसतात. इतक्यात वॉचमन दोन शिट्या मारतो.

शाळेत स्कॉड आल्याचा हा इशारा एका शिक्षकाच्या लक्षात येतो आणि तो विद्यार्थ्यांना इकडे जा, तिकडे जा अशा सूचना द्यायला लागतात. पण ज्यांना सूचना केली तेच ‘स्कॉड’ होते, त्यामुळे शिक्षकाची कशी बोलती बंद झाली असेल, तुम्हीच सांगा...

(nashik SAKAL Special chalta bolta Scod came scod came marathi news)

पार्टीचे बिल नक्की कोण देणार भाऊ...

मित्र मंडळीत पार्टीचा बेत म्‍हटला, की भलताच उत्‍साह येतो. पार्टीच्‍या विषयावर चर्चा रंगू लागतात, मोठेमोठे नियोजन आखले जाऊ लागते. असाच जय्यत तयारी करून दाखल झालेला महाविद्यालयीन युवकांचा ग्रुप हॉटेलमध्ये दाखल झाला.

रंगविलेल्‍या चर्चेप्रमाणे ऑर्डर देत पदार्थ मागविण्यात आले. अन्‌ काही मिनिटात ते फस्तही झाले. आता वेळ आली ती बिल भरण्याची. साहजिकच खोडकरपणा करताना सर्वांनी पळ काढण्याचा प्रयत्‍न करत एका युवकावर बिल देण्याची जबाबदारी ढकलली.

गम्‍मत म्हणजे त्‍याच्‍या खिशात नव्‍हते पैसे. मग धावणाऱ्या युवकांपैकी त्‍याने एकाला पकडले अन्‌ दोघांमध्ये झटापट सुरु झाली. त्‍यावर केविलवाण्या चेहऱ्याने युवकाने डायलॉग मारला, 'तुम्‍हे मेरे लाश से गुजरकर जाना होंगा' इतके ऐकताच उपस्‍थित युवकांमध्ये एकच हशा‍ पिकला.

अन्‌ सद्‌भावनेने इतर एका युवकांनी पुढे येत बिल अदा करताना संबंधित युवकाच्‍या डोक्‍यावर टपली मारली आणि सर्व ग्रुप पुढे मार्गस्‍थ झाला.

10th student in exam hall
SAKAL Special : चालता... बोलता...! लसणाच्या मुळीत नांगर अडकला!

फक्त मनोरंजन हवं असतं

कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रमांतर्गत कुसुमाग्रज स्मारकात नाटकांच्या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकांना रसिकांनी उदंड प्रतिसाद देत गर्दी केली. ही गर्दी इतकी होती, की सभागृहात बसायलाही जागा मिळेनासी झाली.

मोठ्या उत्साहाने नाटक पाहायला आलेले अनेक जण सभागृहाबाहेर येऊन बसले. त्यात काही ज्येष्ठ नागरिक देखील होते, यावेळी दोन ज्येष्ठांमध्ये चर्चा रंगली. ते म्हणाले, बघाना कुसुमाग्रज स्मारकात कितीतरी कार्यक्रम होत असतात, नेहमीच अशी गर्दी होत नाही.

त्यावर दुसरे आजोबा उत्तरले, कसयं ना आताच्या लोकांना केवळ मनोरंजन हवं असत, म्हणून येतात. बाकी इतर कार्यक्रमांसाठी आपण आहोतच ना. चला जाऊ द्या. (Latest Marathi News)

10th student in exam hall
SAKAL Special : चालता... बोलता...! मागल्या बार भी असे फसवलं होत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com